खेड तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील वाडा परिसरात पावसाचे पुनरागमन झाले. या पावसामुळे खरीप पिकांना एकप्रकारे जीवदान मिळाले आहे.
या पट्ट्यात खरीप पिकांचे क्षेत्र अधिक आहे. सुरुवातीला मान्सून चांगल्या प्रकारे सक्रिय झाला, पण नंतर पावसाने दडी मारली. शेतकऱ्यांकडून बाजरी, सोयाबीन, मका, वाटाणा तसेच कडधान्यांच्या पेरण्या केल्या गेल्या. परंतु पावसाअभावी पिके सुकण्यास सुरुवात झाली होती.
दडी मारून बसलेला माॅन्सून सक्रिय झाला आहे, त्यामुळे शेतकरीवर्गातून समाधान व्यक्त होत आहे. दुबार पेरणीचे संकट यामुळे तूर्तास टळले आहे. शेतकरी वर्गातून माॅन्सून अशाच प्रकारे सक्रिय राहिला तर दुबार पेरणीचे संकट पूर्णपणे टळेल, असे मत व्यक्त होत आहे.