शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

अडीच लाखांत रेन वॉटर हार्वेस्टिंग

By admin | Updated: May 16, 2017 06:43 IST

आमदार निधीतून एरवी होतात फक्त सिमेंटचे रस्ते, पेवर ब्लॉक किंवा मग बसण्यासाठी बाक वगैरे! आमदार मेधा कुलकर्णी यांनी मात्र या सगळ्याला फाटा देत

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : आमदार निधीतून एरवी होतात फक्त सिमेंटचे रस्ते, पेवर ब्लॉक किंवा मग बसण्यासाठी बाक वगैरे! आमदार मेधा कुलकर्णी यांनी मात्र या सगळ्याला फाटा देत आपल्या निधीचा वापर रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प उभे करण्यासाठी केला आहे. मतदारसंघांतील ८ सोसायट्यांमध्ये त्यांनी हा प्रकल्प केला असून आणखी १७ सोसायट्यांमध्ये पावसाळ्यापूर्वी हे काम होणार आहे. आमदार निधीचा वापर करण्यासंबधी अनेक नियम आहेत. जिल्हा नियोजन समितीकडून त्याचे नियंत्रण केले जाते. त्यामुळेच कुलकर्णी यांनी निधीचा वापर सोसायट्यांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प सुरू करण्यासाठी करण्याचे ठरवले; मात्र त्याला नकार मिळाला. त्यामुळे मग थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांनी हा निधी या कामासाठी वापरू देण्याची विनंती केली. पावसाचे वाया जाणारे पाणी वाचविणे हा निसर्ग, पर्यावरण संवर्धनाचाच प्रकार आहे. अनेक सोसायट्यांमध्ये असा प्रकल्प सुरू करण्यासाठी पैसे नसतात. त्यामुळे ते कधीही लक्ष देत नाहीत. त्यांच्या इमारतीवरील पावसाचे सर्व पाणी गटारामध्ये जाते. त्याचा कोणालाच काहीही उपयोग होत नाही, हे त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.त्यानंतर विशेष बाब म्हणून कुलकर्णी यांच्या या मागणीला मान्यता देण्यात आली. लगेचच त्यांनी आपल्या मतदारसंघात हे काम सुरू केले. एका कामासाठी साधारण अडीच लाख रुपयांपर्यंत खर्च होतो. खासगी एजन्सीकडून न करता हे काम त्यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याकडूनच करून घेणे पसंत केले. त्यासाठी इमारतीमध्ये बोअर असणे आवश्यक आहे. बोअर नसेल तर ते करून घेण्याचा खर्च मात्र सोसायटीला करावा लागतो. इमारतीच्या गच्चीवरून एका पाईपद्वारे सर्व पाणी इमारतीच्या खाली घेण्यात येते. तो पाईप बोअरमध्ये सोडला जातो. पाईपला मध्यभागी एक फिल्टर बसवण्यात येतो. त्यामुळे बोअरमध्ये कचरा, गाळ जात नाही. आमदार कुलकर्णी यांनी सांगितले, की अनेक सोसायट्यांना हे काम करण्याची इच्छा असते; मात्र इतका खर्च कोणी करायचा, हा प्रश्न असतो. मुख्यमंत्र्यांकडून विशेष बाब म्हणून मान्यता मिळाल्यामुळे आता हा खर्च या निधीतून करता येत आहे. सोसायट्यांनी त्यांच्या लेटरहेडवर एक पत्र द्यावे व अशा प्रकल्पासाठीची बोअर व अन्य प्राथमिक तयारी करावी, त्यांना हा प्रकल्प सुरू करून देण्यात येईल.