शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
3
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
4
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
5
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
6
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
7
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
8
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
9
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
10
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
11
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
12
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
13
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
14
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
15
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
16
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
17
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
18
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
19
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
20
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी भागात पावसाची चाहूल घरे; शेकारण्याच्या कामांना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:09 IST

-- डिंभे : पावसाळ्यातील दिवसांत अतिवृष्टीपासून घरांचे संरक्षण व्हावे या साठी पावसाळ्यापूर्वी घरांची डागडुजी करण्याची आदिवासी भागात पारंपरिक प्रथा ...

--

डिंभे : पावसाळ्यातील दिवसांत अतिवृष्टीपासून घरांचे संरक्षण व्हावे या साठी पावसाळ्यापूर्वी घरांची डागडुजी करण्याची आदिवासी भागात पारंपरिक प्रथा आहे. विविध भागात स्थानिक भाषेत याला वेगवेगळी नावे असली, तरी पावसाळ्यातील चार महिने अतिपावसापासून घरांचे संरक्षण व्हावे हाच या मागचा उद्देश असतो. आंबेगाव तालक्याच्या आदिवासी भागात याला ‘घरे शेकारणे’ असे म्हटले जात असून सध्या या भागातील नागरिक घरे शेकारण्याच्या कामात गुंतले असल्याचे पाहावयास मिळत आहे.

आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागात अता पावसाळ्याची चाहूल लागली आहे. भात पिकाच्या पेरणीबरोबरच पावसाळ्यापूर्वीची इतर कामे आटोपण्यात या भागातील शेतकरी मग्न आहे. आहुपे, कोंढवळ, पाटण या दुर्गम खोऱ्यात काही शेतकऱ्यांनी भात पेरणी करण्यास सुरुवात केली आहे. याबरोबरच या भागात दर वर्षी नियमाने केले जाणारे काम म्हणजे पावसाळा सुरू होण्यापूर्वी घरांची डागडुजी करणे, ही कामे कोकणापासून ते थेट सह्याद्रीच्या पर्वत रांगात पसरलेल्या घाटमाथ्यावर सर्वत्र केली जातात. स्थानिक भाषेनुसार याला वेगवेळी नावे असली, तरी सर्वांचा उद्देश मात्र पावसाळ्यातील चार महिने पावसापासून घरांचे संरक्षण व्हावे हाच आहे.

आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागात सध्या पावसाळ्यापूर्वीच्या शेतीच्या मशागतीच्या कामांसोबतच घरे शेकारणीच्या कामांनीही वेग घेतला असून आहुपे, पाटण खोऱ्यात ही कामे उरकण्यासाठी लगभग सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

--

चौकट

पावसाळा सुरू होण्यापूर्वी घरांची कौले बदलने, त्यांच्या झडपामधून पाणी येणार असेल, तर त्या ठिकाणी नवीन कौले किंवा प्लॅस्टिकचा कागद टाकून त्यावर गवत टाकून या झडपा बंद केल्या जातात. कोकण व घाटमाथ्यावरील अतिपावसाच्या भागात घरांचा अकार चौमवळी स्वरूपाचा असतो. सतत दिवस-रात्र जोरात कोसळणाऱ्या पावसाचे पाणी जलदगतीने खाली उतरण्यासाठी या प्रकारची घरे बांधली जातात. घराच्या भोवताली एका विशिष्ट प्रकारच्या झुडपापासून मिळणाऱ्या झावळ्यांनी घरे शेकारली जातात यामुळ अतिपाऊस व जोरदार वाऱ्याच्या माऱ्यापासून घराच्या भिंतींचे संरक्षण होते. घरे शेकारणीमुळे पावसाळ्याचे चार महिने कितीही पाऊस झाला, तरी घराची ऊब कायम राहाते.

---

फोटो : ०१ डिंभे आंबेगाव तालुला आदिवासी भाग

ओळी- आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागात पावसाळ्याची चाहूल लागली असून, शेतीच्या कामांसोबतच घरे शेकारणीच्या कामांची लगभग सुरू अल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे.(छायाचित्र-कांताराम भवारी.)