शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

चिमुरडीवर काव्यप्रतिभेचा ‘वर्षा’व

By admin | Updated: October 14, 2015 03:30 IST

वय वर्षे ११... तब्बल ४४ कविता... एवढेच नव्हे, तर हुतात्मा राजगुरू साहित्य परिषदेमध्ये काव्यवाचन. ही प्रतिभा लाभली आहे, येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत पाचवीत शिकणाऱ्या वर्षा गजानन माकुडे हिला.

लोणीकंद : वय वर्षे ११... तब्बल ४४ कविता... एवढेच नव्हे, तर हुतात्मा राजगुरू साहित्य परिषदेमध्ये काव्यवाचन. ही प्रतिभा लाभली आहे, येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत पाचवीत शिकणाऱ्या वर्षा गजानन माकुडे हिला. आताच ती ‘छोटी बहिणाबाई’ या नावाने ओळखली जाते आहे.वढू खुर्द (ता. हवेली) या सुमारे एक हजार लोकवस्ती असलेल्या खेड्यातील ही मुलगी. कोणताही शैक्षणिक, सामजिक वारसा नाही. मोबाईल, व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकचा स्पर्श नाही. फक्त वाचनातून शिकलेली. तिचे काव्यवाचन व लेखन अचंबित करणारे आहे.शाळेचे मुख्याध्यापक सुदर्शन शेलार व वर्गशिक्षक सचिन बेंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षाने शाळेत मुलांचे ‘प्रेरणा साहित्य मंडळ’ स्थापन कले. त्यास मुलांचा प्रतिसाद मिळाला. या मंडळामधून मुलांना पुस्तक वाटप केले जाते. स्वतंत्र गं्रथपालाची नेमणूक केली आहे. हे ग्रंथालय मुलांसाठीच नव्हे, तर शिक्षक, पालक व ग्रामस्थ यांनाही खुले आहे. सध्या पुस्तके कमी असली तरी १८४ सदस्य आहेत.वर्षाचे वडील गजानन नोकरी करतात. आई शोभा गृहिणी आहे. वर्षाच्या कलागुणांना ते भरभरून प्रोत्साहन देतात. ज्येष्ठ गझलकार म. भा. चव्हाण व हास्यकवी बंडा जोशी यांनी तिचा उल्लेख ‘छोटी बहिणाबाई’ असा करून कौतुक केले आहे.