शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे कर्मचाऱ्यांचाच ‘रेल रोको’

By admin | Updated: November 14, 2015 03:03 IST

रेल्वे स्थानक परिसरात लूटमारीच्या घटना वाढत असून आठवडाभारात दोन रेव्ले कर्मचाऱ्यांना मारहाण करून लूटण्यात आले

दौंड : रेल्वे स्थानक परिसरात लूटमारीच्या घटना वाढत असून आठवडाभारात दोन रेव्ले कर्मचाऱ्यांना मारहाण करून लूटण्यात आले. त्यामुळे संतप्त रेल्वेचालकांनी शुक्रवारी दौंड-पुणे शटलसेवा सुमारे ३० मिनिटे रोखून धरली.याबाबत अधिक माहिती अशी की, पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास रेल्वेचालक पंकजकुमार मालगाडी घेऊन पुणतांब्याला जाणार होते. त्यासाठी ते आपल्या घरून रेल्वेस्थानकावर जाण्यासाठी पायी निघाले होते. रेल्वेस्थानकाच्या परिसरात दुचाकीवर दोघे जण आले. त्यांनी तोंडाला फडके बांधले होते. त्यातील एकाने लोखंडी रॉड काढला आणि पंकजकुमार यांच्या हातावर आणि पायावर मारला. दुसऱ्याने चाकू काढून म्हणाला, ‘‘आवाज केलास तर भोसकून टाकेल. हा सर्व संवाद चोरटे हिंदीतून करीत होते. या वेळी पंकजकुमार यांच्याकडून एक हजार रुपये, मोबाईल, बॅग हिसकावून घेतली. या बॅगेत एटीएम कार्ड, मतदान कार्ड यांसह महत्त्वाची कागदपत्रे होती. ही घटना रेल्वे पोलिसांना कळविण्यात आली. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक शाम पवरे अधिक तपास करीत आहेत. गेल्या आठवड्यात रेल्वेस्थानक परिसरात शस्त्राचा धाक दाखवून तिकीट तपासणीसाची लूटमार केली होती. तीन दिवसांपूर्वी दोन केळी विके्रत्यांनी एका प्रवाशाला फलाट नं. ५ वर मारहाण केली होती. आठवड्यातील ही तिसरी घटना असल्याने रेल्वे कर्मचाऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेच्या निषधार्थ रेल्वेचालकांनी दौंड-पुणे शटलसेवा सुमारे ३० मिनिटे रोखून धरली. जोपर्यंत रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची हमी मिळत नाही, तोपर्यंत गाडी पुढे जाऊ देणार नाही. या पवित्र्यावर रेल्वे कर्मचारी ठाम होते. त्यानंतर रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आणि पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी ती गाडी पुढे जाण्यासाठी सहकार्य केले.रेल्वे स्थानक परिसरातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता पोलिसांनी गस्त घालावी, अशी मागणी रेल्वे कर्मचारी आणि प्रवाशांनी केली आहे. (वार्ताहर)1दौंड येथे रेल्वेचालकाची पहाटे साडेपाचच्या सुमारास लूटमार झाली. त्यानंतर पुढे बोरावकेनगर परिसरात एका टॅ्रक्टरचालकाला मारहाण करण्यात आली. एका मॉर्निंग वॉक करणाऱ्या व्यक्तीची लूटमार करीत असताना काही वाहने येत असल्याचे लक्षात येताच हे चोरटे पळून गेले. ही घटना पहाटे सहाच्या सुमारास घडली. या वेळी दोघेही चोरटे दुचाकीवर होते. रेल्वेचालकाची लूटमार करणारेदेखील दोघे दुचाकीवर होते. या तिन्ही घटना याच चोरट्यांनी केल्या असल्याची शक्यता आहे.