शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कांद्यावरील करपा घालविण्यासाठी देशी दारूची मात्रा

By admin | Updated: September 18, 2015 01:12 IST

ढगाळ हवामानामुळे सध्या पिकांना विविध रोगांनी ग्रासले आहे. औधांची फवागरणी करूनही काही उपयोग होत नसल्याने विशेषत: कांदा पिकावरील करपा घालविण्यासाठी

पळसदेव : ढगाळ हवामानामुळे सध्या पिकांना विविध रोगांनी ग्रासले आहे. औधांची फवागरणी करूनही काही उपयोग होत नसल्याने विशेषत: कांदा पिकावरील करपा घालविण्यासाठी शेतकऱ्यांनी चक्क देशी दारूची मात्रा देण्यास सुरूवात केली आहे. जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी रमेश धमाळ यांनी दारूमुळे कोणताही रोग अटोक्यात येत नसल्याने शेतकऱ्यांनी असे प्रकार करू नयेत असे आवाहन केले आहे.गेल्या आठवडाभर जिल्ह्यात परतीचा पाऊस सुरू झाला आहे. मात्र सगळीकडे ढगाळ हवामान आहे. परिणामी उरल्या सुरल्या पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होवू लागला आहे. डाळिंब असेल तर तेल्या, कांदा असेल तर करपा, केळी असेल तर चिकट्या रोग आढळून येत आहे. यामुळे शेतातील पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्याला महागडी औषधे विकत घेऊन, त्या त्या पिकांवर फवारणी करावी लागते. त्यातूनही पीक वाचेल की नाही, याबाबत शंका असते. सध्या कांदा पिकासाठी अनेक शेतकऱ्यांनी वेगळा पर्याय शोधला आहे. देशी दारूची कांद्यावर फवारणी करून करपा, मान मोडलेला कांदा यावर उपाय शोधला आहे. ‘देशी’ फवारा... अन् कांदा वाचवा’ अशीच चर्चा अनेक ठिकाणी सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांनी ‘देशी’चा हा प्रयोग केला आहे. कांद्याला चांगला बाजारभाव आल्याने शेतकरीवर्ग कांदा पिकाकडे अधिक वळला आहे. त्यातच सध्याच्या काळात कांद्याचे दर गगणाला भिडले आहेत. त्यामुळे कांदा काढून लगेचच विक्रीसाठी बाजारपेठेत नेला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा धनलाभ होत आहे, असे असताना पूर्वी लागवड केलेल्या कांद्यावर करपा रोग पडणे, माना खाली टाकणे, जळून जाणे आदी प्रकार घडत आहेत. त्यामुळे बी-बियाणे, खतांच्या दुकानात औषधे विकत घेण्यासाठी गर्दी होते. मात्र, एवढी महागडी औषधे फवारणी करूनही अनेक वेळा उपयोग होत नसल्याने शेतकऱ्यांनी हा नवा पर्याय शोधला आहे. काही शेतकऱ्यांनी ‘देशी’चा प्रयोग केल्याने, इतर शेतकरीही या प्रयोगाचा अवलंब करीत आहेत. पाण्यामध्ये देशी दारूचे मिश्रण करून, त्या मिश्रणाची कांदा पिकावर फवारणी केली जात आहे. त्यामुळे याची चर्चा व केलेला प्रयोग अनेक शेतकरी एकमेकांना सांगू लागल्याने इतर शेतकरीदेखील हा प्रयोग करू लागले आहेत. (वार्ताहर)दारूची फवारणी स्वस्तात मस्त...पिकाच्या संरक्षणासाठी वापरली जात असल्याने देशी दारू पुन्हा चर्चेत आली आहे. याबाबत एका शेतकऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, कांदा पिकावर देशी दारूची फवारणी केल्यास, कांदा पिकावरील सर्व रोग नष्ट होत आहेत. त्यामुळे इतर औषधांपेक्षा देशी दारूची फवारणी स्वस्तात मस्त आहे. तसेच, या फवारणीमुळे कांदा चांगला तरारत आहे, असे ही त्यांनी सांगितले.दारू फवारणी केल्याने कोणताही रोग आटोक्यात येत नाही. ढगाळ हवामान असल्याने रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. मात्र यासाठी कृषी विद्यापीठाने शिफारस केलेल्या औषधांचाच वापर केला पाहिजे. सध्या अधूनमधून पाऊस पडत असल्याने औषधे फवारली तरी उपयोग होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य प्रकारे, योग्य प्रमाणात व योग्य वेळी औषधांची फवारणी केली तर रोग नक्कीच आटोक्यात येतील.रमेश धुमाळकृषी अधिकारी, जिल्हा परिषद