शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

ब्रॅँडेड अन्नधान्यावर जीएसटीच्या विरोधात व्यापारी आंदोलनाच्या पवित्र्यात

By admin | Updated: May 25, 2017 02:53 IST

सर्व शेतीमाल जीएसटीमुक्त राहणार असल्याचे जाहीर करतानाच केंद्र शासनाने ब्रँडेड अन्नधान्यांवर ५ टक्के जीएसटी लागू केल्याने व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : सर्व शेतीमाल जीएसटीमुक्त राहणार असल्याचे जाहीर करतानाच केंद्र शासनाने ब्रँडेड अन्नधान्यांवर ५ टक्के जीएसटी लागू केल्याने व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली असून सध्या बाजारपेठेत ९५ टक्के ब्रँडेड माल विकला जात असल्याने ही व्यापारी आणि नागरिकांची एक प्रकारे फसवणूक आहे. जर हा कर मागे घेतला नाही, तर एलबीटीपेक्षा उग्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा पुण्यातील व्यापाऱ्यांनी ‘लोकमत व्यासपीठा’वरून दिला़जीएसटीमधील तरतुदींबाबत लोकमत कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत पूना मर्चंट चेंबरच्या पदाधिकाऱ्यांनी या कायद्यातील त्रुटी दाखवून दिल्या़ या वेळी पूना मर्चंट चेंबरचे अध्यक्ष प्रवीण चोरबेले, उपाध्यक्ष जवाहरलाल बोथरा, सचिव अशोक लोढा, सहसचिव रायकुमार नहार, माजी अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, अजित सेटिया, फेडरेशन आॅफ असोसिएशन आॅफ ट्रेडर्सचे अध्यक्ष वालचंद संचेती उपस्थित होते़चेंबरचे अध्यक्ष प्रवीण चोरबेले यांनी सांगितले, की केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची मुंबईत व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली, तेव्हा अन्नधान्यावर कोणताही कर लावला जाणार नाही़ ज्या वस्तंूवर वॅट आहे, त्याच वस्तूंना जीएसटी लागेल, असे सांगितले होते़ प्रत्यक्षात अन्नधान्याला जीएसटीतून वगळल्याची घोषणा करताना त्याखाली कायद्यात ब्रँडेड मालाला ५ टक्के जीएसटी लागू केला आहे़ ही तरतूद अन्यायकारक असून, प्रामाणिक व्यावसायिकांना त्रासदायक आहे़ एकच वस्तू बँ्रडमध्ये असल्यास त्यावर जीएसटी आकारणी, तर तीच वस्तू ब्रँड नसेल तर त्यावर जीएसटी नाही़ यासारख्या तरतुदीमुळे शासनाला जीएसटीपासून मिळणारा महसूल तर मिळणार नाहीच; परंतु विनाकारण वेगवेगळ्या मार्गांनी जीएसटी कसा चुकवावा, यावर भर दिला जाईल़ चेंबरचे माजी अध्यक्ष वालचंद संचेती आणि पोपटलाल ओस्तवाल यांनी सांगितले, की जीवनाश्यक वस्तूंमध्ये भेसळ होऊ नये, म्हणून कायदा करण्यात आला आहे़ त्यामुळे या वस्तू आता पॅकबंद स्वरूपात विकल्या जातात़ त्यामुळे त्यांच्यावर आता ५ टक्के जीएसटी लागणार आहे़ त्यातून महागाई वाढेल़ साखर, बेदाणा यासारख्या वस्तूंवरही आता ५ टक्के जीएसटी लागणार आहे़ त्यामुळे सर्व प्रकारच्या जीवनाश्यक वस्तू, मग त्या बँ्रडेड असल्या तरी त्यांना जीएसटीमधून सूट मिळावी, अशी व्यापाऱ्यांची मागणी आहे़केंद्र शासनाने याबाबत आवश्यक ती पावले न उचलल्यास नाइलाजाने व्यापाऱ्यांना आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल़ यापूर्वी एलबीटीच्या विरोधात ज्याप्रमाणे आंदोलने झाली, त्यापेक्षा या आंदोलनाची व्याप्ती कितीतरी अधिक असू शकेल़