ग्रामीण रुग्णालयाच्या प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार : सासवड येथे १०९ जणांची तपासणी केली असता ४२ बाधित असल्याचे आढळून आले. त्यामध्ये सासवड शहरातील २५ रुग्ण, तर भिवडी, नाझरे क. प., दिवे, हिवरे, बेलसर, पिसर्वे, वाल्हे, सिंगापूर, निळुंज ,पिंपळे ,पांगारे ,गराडे येथील प्रत्येकी १ रुग्ण आहे. जावळार्जुन मधील २ ,वडकी १, भेकरेनगर १, पुणे येथील १ रुग्ण आहे. जेजुरी येथील रुग्णालयात ४९ जणांची तपासणी झाली त्यामध्ये जेजुरी १४, कोळविहीरे १ ,साकुर्डे २, दौंडज ३, भोसलेवाडी १, नाझरे क प १, तक्रारवाडी १ या रुग्णाचा समावेश आहे. नागरिकांनी गर्दी करू नये ,मास्क लावावेत, सॅनिटायझर चा वापर करावा अशा सूचना प्रशासनाकडून वारंवार दिल्या जात आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णाची संख्या वाढत आहे, मात्र अनेकजण बरे होत आहेत.
पुरंदरमध्ये दिवसात आढळले ६५ कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:11 IST