शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
2
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
3
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
4
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
5
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
6
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
7
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
8
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
9
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
10
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
11
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
12
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
13
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
14
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
15
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
16
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
17
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
18
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
19
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
20
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?

पुणेकरांना मिळणार २४ तास समान पाणी

By admin | Updated: May 23, 2015 00:36 IST

महापालिकेकडून तयार करण्यात आलेल्या समान पाणीवाटपाच्या २ हजार ८१८ कोटी रुपयांच्या आराखड्यास शुक्रवारी मुख्य सभेत एकमताने मान्यता देण्यात आली.

पुणे : शहराला २४ तास आणि समान पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेकडून तयार करण्यात आलेल्या समान पाणीवाटपाच्या २ हजार ८१८ कोटी रुपयांच्या आराखड्यास शुक्रवारी मुख्य सभेत एकमताने मान्यता देण्यात आली. या योजनेस केंद्रशासनाच्या जेएनएनयूआरएम योजनेतून निधी मिळेल, असे प्रस्तावित करण्यात आले होते. मात्र, केंद्रशासनाने जेएनएनयूआरएम योजना बंद केल्याने आता हा प्रकल्प स्मार्ट सिटी योजनेसाठी सादर करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी दिली. शहराची २०४७ ची लोकसंख्या गृहीत धरून हा आराखडा तयार करण्यात आलेला आहे. ४शहरात तीन लाख मीटर बसविणार ४ शहराची पाणी प्रक्रिया क्षमता २००० एमएलडी प्रतिदिन (सध्याची क्षमता १३६० एमएलडी इतकी आहे.)४४ हजार किलोमीटरच्या जलवाहिन्यांचे नवीन जाळे४शहरासाठी १९.५० टीएमसी पाणी घेणार ४१०३ नवीन टाक्या बांधणार ४१६१ झोनद्वारे पाणीपुरवठा ४३२८ विभागीय झोन अ) नवीन पाच पाणी टाक्या २९३ कोटी १० लाख ब) तीन टाक्यांची पुनर्बांधणी २३ कोटी ७३ लाख क) जलशुद्धीकरण केंद्राची पुनर्बांधणी ५ कोटी ६६ लाख ड) पंपिग स्टेशन १४२ कोटी १३ लाख इ) पाणीवाटप आणि मीटर २ हजार १७७ कोटी शिफ्टिंगची कामे ५ कोटी ३० लाख विविध परवाने ५० लाख सल्लागार शुल्क २७ कोटी १० लाख आयत्यावेळचा खर्च ८१ कोटी ३० लाख एकूण खर्च २ हजार ८१८ कोटी ४६ लाखहा प्रकल्प शहरासाठी महत्त्वाचा आहे. जेएनएनयूआरएम योजना बंद झाली आहे. मात्र, केंद्राने नुकतीच स्मार्ट सिटी योजना जाहीर केली आहे. त्यामुळे मुख्य सभेने या आराखड्यास मान्यता दिल्यास तो स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत केंद्राकडे तत्काळ पाठविता येईल. तसेच या योजनेच्या अटी आणि शर्ती तसेच खर्चाच्या तपशिलाचा आराखडा मुख्य सभेत मान्यता घेऊनच पुढे पाठविला जाईल. त्यामुळे मुख्य सभेची तत्काळ मान्यता आवश्यक होती. - कुणाल कुमार, महापालिका आयुक्त४या योजनेत शहरातील सर्व मीटर महापालिका बसविणार आहे. त्यानुसार, प्रतिमीटर सात हजार रुपयांप्रमाणे जवळपास तीन लाख मीटरसाठी २१० कोटी रुपयांचा खर्चही महापालिकेस सोसावा लागणार आहे. त्यामुळे मीटरसाठीच्या खर्चाबाबत नंतर निर्णय घ्यावा, अशी मागणी या वेळी काही नगरसेवकांनी केली. मात्र, त्याबाबत कोणताही निर्णय न झाल्याने हा खर्च पालिकेस उचलावा लागणार आहे.कोटी या योजनेचा खर्च आहे. या योजनेंर्तगत शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्यासाठी मीटर बसविण्यात येणार आहे. त्यासाठी जवळपास तीन लाख मीटर लागणार आहेत. त्याचबरोबर अस्तित्वात असलेल्या जलवाहिन्यांची गळती शोधून त्यावर उपाययोजना करण्यात येणार आहे. तसेच जलकेंद्रांची संख्या वाढविणे, पाण्याच्या नवीन टाक्या बांधणे अशी कामे या योजनेंतर्गत होणार आहे. पाच वर्षांत ही योजना राबविली जाणार असून, अंदाजपत्रकात त्यासाठी तरतूद केली जाणार आहे. स्मार्ट सिटी योजनेतही हा प्रस्ताव पाठविला जाणार आहे.