शहरं
Join us  
Trending Stories
1
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
2
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
3
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
4
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
5
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
6
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
7
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
8
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
9
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
10
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
11
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
12
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
13
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
14
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
15
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...
16
ऐकावं ते नवलच! २४ लाख रुपये खर्चून बनवलेला तलाव चोरीला गेला? शोधून काढणाऱ्याला गावकरी देणार बक्षीस
17
इंडोनेशियात गुलाबी कपडे घालून हातात झाडू घेत हजारोंच्या संख्येने महिला रस्त्यावर का उतरल्या?
18
इस्रायलने प्रक्षेपित केला गुप्तचर उपग्रह, २४ तास शत्रूवर लक्ष ठेवणार
19
टाटा स्टीलसह 'हे' शेअर्स तेजीत! अमेरिकेच्या ‘टॅरिफ’ तणावातही बाजाराची झेप! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ
20
आशिया कप स्पर्धेत हार्दिक पांड्याला मोठा डाव साधण्याची संधी; याआधी फक्त तिघांनी गाठलाय हा पल्ला

‘पुणे प्रॉपर्टी शोेकेस’चे उद्या उद्घाटन

By admin | Updated: March 10, 2017 00:13 IST

‘लोकमत’तर्फे आयोजन : एकाच छताखाली पुण्यातील अनेक गृहपर्याय उपलब्ध

कोल्हापूर : गेल्या पाच वर्षांपासून लोकमत कोल्हापुरात ‘पुणे प्रॉपर्टी शोकेस’ या नावाने पुण्यातील नामांकित व प्रथितयश बांधकाम व्यावसायिकांच्या प्रदर्शनाचे आयोजन करते. यंदा या उपक्रमाचे यशस्वी सहावे वर्ष असून यामध्ये पुण्यातील नामांकित बांधकाम व्यावसायिकांचे १००हून अधिक गृहप्रकल्प पाहता येणार आहेत. या प्रदर्शनास बँकिंग पार्टनर बँक आॅफ महाराष्ट्र आहे. या भव्य गृहप्रदर्शनाचे हॉटेल पॅव्हेलियनमधील मधुसुधन हॉल येथे उद्या, शनिवारी सकाळी १०.०० वाजता उद्घाटन होणार आहे़ या गृहप्रदर्शनात अफोर्डेबल होम्स, लक्झुरियस होम्स, व्यावसायिक प्रकल्प असे प्रॉपर्टीमधील गुंतवणुकीसाठीचे अनेक पर्याय कोल्हापूरकरांना पाहता येणार आहेत़ पुणे, पिंपरी-चिंचवड व संपूर्ण पुणे जिल्ह्यातील अनेक प्रकल्पांची माहिती एकाच छताखाली मिळणार असल्यामुळे या प्रदर्शनामध्ये वेळेची व पैशाची बचत होणार आहे़ आपल्या स्वप्नातील व आपल्या गरजेप्रमाणे हवे असणारे मनपसंत घर येथे ग्राहकांना पाहता येणार आहेत़ या प्रदर्शनासाठी बांधकाम व्यावसायिकांनी अनेक वैशिष्ट्यपूर्ण व आकर्षक योजना आखल्या आहेत़ त्यांचाही लाभ या प्रदर्शनात भेट देणाऱ्यांना मिळणार आहे़ गेल्या ५ वर्षांमध्ये कोेल्हापूरमधील अनेक इच्छुकांनी आपले पुण्यातील घर नक्की करत, हे प्रदर्शन यशस्वी केले आहे. पुण्यात महाराष्ट्राबरोबर देशभरातून विविध प्रकारच्या शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी येत असतात. इथल्या सुरक्षित सामाजिक व सांस्कृतिक जीवनाच्या समतोलामुळे अनेक जण नोकरी-व्यवसायानंतर येथेच स्थायिक होणे पसंत करतात. नुकताच ‘पुण्याचा’ स्मार्ट सिटीमध्ये झालेला समावेश या शहराची भविष्यातील वाढ व येथे असणाऱ्या संधी दर्शविते. पुण्यात आता ‘मेट्रो’ रेल्वेचा प्रकल्पही येऊ घातला आहे. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी आपापली कार्यालये पुण्यात स्थापन केली आहेत. त्यामुळे पुण्यात रोजगाराच्या संधीत नव्याने भर पडत आहे. पुणे शहराचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे येथील परवडणाऱ्या घरांपासून, मध्यमवर्गीय घरांपासून ते लक्झरी प्रकल्पांपर्यंत गृहक्षेत्रात अनेक पर्याय सहज उपलब्ध आहेत; अशा विविध स्तरांना सामावणारे पुणे हे गुंतवणुकदारांचे आकर्षण ठरले आहे. पुण्यातील गृहप्रकल्पांची सखोल व सविस्तर माहिती मिळण्याची वर्षातील एकमेव संधी शनिवार, दि. ११ व रविवार, दि़ १२ मार्चला मिळत असून नागरिकांनी या भव्य प्रदर्शनाला भेट देऊन आपल्या गृहस्वप्नांची पूर्तता करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. नामांकित बांधकाम व्यावसायिकांचा सहभागप्लेटॉर लाईफ स्पेसेस प्रा.लि., भंडारी असोसिएट्स़, मॅपल शेल्टर्स, परांजपे स्किम्स, गार्डियन डेव्हलपर्स, नाईकनवरे डेव्हलपर्स प्रा़लि़, कोलते-पाटील डेव्हलपर्स, निर्माण डेव्हलपर्स, मंत्रा प्रॉपर्टीज, अमित एंटरप्रायजेस हाउसिंग लि., सार्थक हाउसिंग, सुमेरू ग्रुप.प्रदर्शनाची वैशिष्ट्येबॅँक आॅफ महाराष्ट्रची इच्छुक ग्राहकांचे उत्पन्न विचारात घेऊन ताबडतोब तत्त्वत: गृहकर्ज मंजुरीपत्र देण्याची व्यवस्था १० लाख रु. ते ८ कोटी रु.पर्यंतचे प्रकल्प.मोफत स्टॅम्पड्यूटी व रजिस्ट्रेशन, योग्य डाऊन पेमेंट, आकर्षक ईएमआय यांसारख्या योजना.पझेशननंतर ईएमआय, प्रीलाँच आॅफर्स. रेडिपझेशन घरांवर सवलती