शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
4
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
6
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
7
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
8
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
9
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
10
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
11
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
12
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
13
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
14
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
15
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
16
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
17
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
18
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
19
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
20
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार

Pune News : नगरसेवक पदावरून गेले, प्रशासकराज आले अन् पुणे तुंबले..!

By राजू हिंगे | Updated: June 10, 2025 09:52 IST

- प्रभागातील गल्ली, बोळातील गटारी- नाल्यांत पाणी कुठे तुंबते? याची माहिती नगरसेवकांना असे त्यानुसार कामे व्हायची, प्रशासनराजमध्ये बहुतेकदा कामे केवळ कागदावरच केली जात असल्याने कुणालाच कुणाचा ताळमेळ नसल्याची टीका

पुणे : पुणे महापालिकेत गेल्या तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून प्रशासकराज आहे. या कालावधीत शहरात एक ते दाेन तास धुवाधार पाऊस झाला की पुणे तुंबते. पाणी साचल्यामुळे नागरिकांचे अतोनात हाल होतात. नगरसेवकांना प्रभागातील गल्ली, बोळातील गटारी, नाले यांचे पाणी कुठे तुंबते, याची माहिती होती. त्यानुसार ते काम करून घेत होते. मात्र कनिष्ठ अभियंत्यांना प्रभागाची तेवढी सखोल माहिती नाही. त्यात कामे केवळ कागदावरच केली जात आहेत. त्यामुळे नगरसेवक पदावरून गेले आणि प्रशासकराज आले. त्यामुळे पुणे तुंबत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. पुणे महापालिकेच्या सभागृहाची मुदत १४ मार्च २०२२ रोजी संपली. त्यानंतर पालिकेची निवडणूक झाली नाही. 

त्यामुळे पुणे महापालिकेमध्ये प्रशासकराज सुरू झाले. पालिका आयुक्तच प्रशासक म्हणून काम पाहू लागले. पालिकेचे सभागृह अस्तित्वात असताना म्हणजे नगरसेवक असतानाही जेवढ्या प्रमाणात पाऊस पडत होता, तेवढाच पाऊस आताही पडत आहे. पण, आता पुणे जेवढे तुबंते तेवढे नगरसेवक असताना तुंबत नव्हते. नगरसेवकांना प्रभागाची भौगौलिकदृष्ट्या सर्व माहिती असते.

काही जण दोन ते पाच टर्म नगरसेवक राहिले आहेत. त्यामुळे प्रभागात मुसळधार पाऊस किंवा पूर आल्यानंतर कुठल्या भागात घरांमध्ये पाणी शिरते, कुठल्या भागात पाणी साचते, कुठे सीमाभिंत धोकादायक आहे, नालेसफाई, पावसाळी गटारी कुठे आहेत, त्यांची सद्यस्थिती काय आहे, याची खडानखडा माहिती नगरसेवकांना होती. पण, याउलट महापालिकेच्या कनिष्ठ अभियंत्यांना प्रभागांमध्ये पावसाळी लाईनचे चेंबर, कुठे पाणी साचते, त्याची बारीकसारीक माहिती नसते. नगरसेवकांचे पावसाळीपूर्व कामांवर लक्ष होते आणि ठेकेदारांवर अंकुश होता. नगरसेवक संबंधित ठेकेदारांकडून कामे करून घेत होते.

नाले, पावसाळी गटारीची साफसफाई क्षेत्रीय ऐवजी आता मुख्य खात्यामार्फतनाले, पावसाळी गटारीची साफसफाई कामे ही पूर्वी क्षेत्रीय कार्यालय स्तरावर केली जात होती, परंतु गेल्या तीन वर्षांपासून ही कामे मुख्य खात्यामार्फत केली जातात. त्यामुळे मुख्य खात्याच्या अधिकाऱ्यांसह कनिष्ठ अभियंत्यांना प्रभागातील पावसाळी गटारी ट्रेन लाईन आणि नाले यांची सखोल माहिती नसते. शहरातील नाले आणि पावसाळी गटारीची केवळ दर्शनी भागात साफसफाई केली जाते. त्यामुळे पावसाळ्यात पाणी तुंबून नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागते. 

अनेक कामे केवळ कागदावरचनगरसेवकांना प्रभागात ड्रेनेज लाईन कुठे बदलण्याची गरज आहे, नाले कुठे तुबंतात, याची माहिती असते. त्यामुळे पालिकेच्या अंदाजपत्रकात ‘स’ यादीद्वारे नगरसेवक तरतूद करून कामे करत होते. पण, आता पालिकेचे अधिकारी आणि ठेकेदार यांची मिलीभगत असून, अनेक कामे केवळ कागदावरच होत आहेत. अनेक ठिकाणी बांधकामासाठी नाले वळविले जात आहेत, असा आरोप काँग्रेसचे माजी गटनेते अरविंद शिंदे यांनी केला.

कनिष्ठ अभियंत्यांना प्रभागाचे ज्ञान नाही !कनिष्ठ अभियंत्यांना प्रभागामध्ये किती पावसाळी चेंबर आहेत याचेही ज्ञान नाही. कनिष्ठ अभियंते हे माजी नगरसेवकांनाही विश्वासात घेत नाहीत. त्यामुळे नाले आणि पावसाळी गटारीची साफसफाई व्यवस्थित होत नाही, असे भाजपचे माजी नगरसेवक बाळा ओसवाल यांनी सांगितले.  

पावसाळी गटारी, नालेसफाई कामे क्षेत्रीय कार्यालय स्तरावर करावीतप्रभागांमध्ये पाणी तुंबत असल्याच्या तक्रारी घेऊन नागरिक नगरसेवकांकडे येत होते. त्यानुसार नगरसेवक प्रभागामध्ये काम करत होते. पावसाळी गटारी आणि नालेसफाईची कामे क्षेत्रीय कार्यालय स्तरावर केली पाहिजे. किमान ५० लाखांपर्यंतचे काम करण्याचे अधिकार क्षेत्रीय कार्यालयांना द्यावे, असे शिंदे सेनेचे माजी नगरसेवक प्रमोद नाना भानगरे यांनी सांगितले.

महापालिकेच्या दोन विभागामध्ये समन्वय नाहीकोंढवा येथे पुणे महापालिकेच्या ड्रेनेज विभागाने ड्रेनेजच्या चेंबरचे काम केले होते. पण, पालिकेच्या पथ विभागाने हे चेंबर तोडून त्यामध्ये माती भरली होती. त्यामुळे दोन्ही बाजूच्या एक किलोमीटर लांबीच्या ड्रेनेजच्या लाईन चोकअप झाल्या होत्या. त्यामुळे ड्रेनेजलाईन तुंबत होती. याप्रमाणे अनेक घटना घडत आहेत. पुणे महापालिकेच्या दोन विभागांमध्ये समन्वय नाही. त्यामुळे पाणी तुंबण्याचे प्रमाण वाढले आहे, असे मनसेचे माजी नगरसेवक साईनाथ बाबर यांनी सांगितले.

निविदामध्ये रिंग, पालिका अधिकारी चालवितात की ठेकेदार !

पावसाळीपूर्व कामांच्या झोननुसार निविदा काढल्या जातात. त्यामुळे एका झोनमध्ये चार क्षेत्रीय कार्यालये आहेत. संबंधित ठेकेदाराला पाणी तुंबल्यावर फोन केला, तर मी तिकडे आहे, असे उत्तर दिले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून प्रभागांमध्ये तेच ठेकेदार काम करत आहेत. त्यामुळे निविदामध्ये रिंग होत आहे, त्याचा परिणाम कामावरती होत आहे. पालिका अधिकारी चालवतात की ठेकेदार असा प्रश्न पडत आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी स्थायी समितीचे अध्यक्ष विशाल तांबे यांनी सांगितले.

प्रशासन काळामध्ये कोणाचा कोणालाही ताळमेळ नाहीनगरसेवक असताना प्रभागातील कामांवर लक्ष असायचे. ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर नगरसेवकांचा अंकुश होता. पण, आता प्रशासक काळामध्ये कोणाचा कोणालाही ताळमेळ नाही. पावसाळीपूर्व कामे काही भागात पूर्ण होतच नाहीत, असे शिवसेना (उद्धव ठाकरे गट) माजी गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी सांगितले.नागरिकांच्या तक्रारीला प्रशासन दाखविते केराची टोपलीपुणे महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग पूर्ण क्षमतेने कार्यरत नाही. नागरिक अधिकाऱ्याकडे तक्रारी घेऊन गेल्यानंतर त्याला केराची टोपली दाखविली जाते. पावसाळीपूर्व कामे करताना चेंबरमधील गाळ काढून तो बाजूला ठेवला जातो. पाऊस पडल्यावर तो गाळ पुन्हा चेंबरमध्ये जातो. त्यामुळे या प्रकारच्या साफसफाईला काही अर्थ राहत नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी सभागृह नेते सुभाष जगताप यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड