शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

पुणे मेट्रोमागचा ससेमिरा कायम

By admin | Updated: October 29, 2016 04:33 IST

आठ-पंधरा दिवसांत मिळेल, असे सांगण्यात येत असलेली पुणे मेट्रोची केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता महिना बदलत आला तरी मिळायला तयार नाही. निवडणूक आचारसंहितेमुळे

पुणे : आठ-पंधरा दिवसांत मिळेल, असे सांगण्यात येत असलेली पुणे मेट्रोची केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता महिना बदलत आला तरी मिळायला तयार नाही. निवडणूक आचारसंहितेमुळे ती लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. त्यातच राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणासमोरील (एनजीटी) सुनावणीही आता नोव्हेंबरपर्यंत पुढे गेली आहे. पुण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या या प्रकल्पावरून शहरात भारतीय जनता पक्ष व अन्य राजकीय पक्षांमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण मात्र जोरात सुरू आहे.मेट्रोच्या एकूण मार्गापैकी काही भाग नदीपात्रातून जातो. त्यासाठी पात्रात खांब टाकावे लागणार आहेत. त्यामुळे नदीपात्रात धोका पोहोचणार असल्याचा मुद्दा उपस्थित करून काही स्वयंसेवी संस्थांनी एनजीटीमध्ये याचिका दाखल केली आहे. त्याची सध्या सुनावणी सुरू आहे. यापूर्वीच्या सुनावणीत न्यायाधिकरणाने महापालिकेला जैवविविधता समितीचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे पालिकेने अहवाल सादर केला असल्याची माहिती मिळाली. त्यावर शुक्रवारी सुनावणी होती, मात्र पालिकेचे वकील प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे न्यायाधिकरणाने सुनावणीसाठी आता २१ नोव्हेंबर ही तारीख दिली आहे. (प्रतिनिधी) केंद्रीय मंत्रिमंडळाची अद्याप नाही मान्यताकेंद्र सरकारच्या सार्वजनिक गुंतवणूक मंडळाने (पीआयबी) मेट्रोच्या प्रस्तावाला मान्यता दिल्यानंतर मेट्रो जणू पुण्यात सुरूच झाली, असा जल्लोष भाजपाने केला होता.पालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने त्याला हरकत घेत भाजपावर तीव्र टीका केली होती; तसेच त्यांनी शहरात लावलेले मेट्रोच्या स्वागताचे फलक काढून टाकायला लावले होते. त्यानंतरही भाजपासह सर्वच राजकीय पक्षांचे मेट्रोवरून आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्याला जोर चढला आहे.