शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

पुणे कोणाची जहागिरी नाही

By admin | Updated: February 15, 2017 02:35 IST

अभिव्यक्तिी स्वातंत्र्याचा हक्क घटनेनेच मला दिला आहे. जोवर जिवंत आहे, तोवर मी बोलतच राहीन. प्रक्षोभक बोलत असल्याचा आरोप

पुणे : अभिव्यक्तिी स्वातंत्र्याचा हक्क घटनेनेच मला दिला आहे. जोवर जिवंत आहे, तोवर मी बोलतच राहीन. प्रक्षोभक बोलत असल्याचा आरोप करून मला पुण्यात येण्यापासून रोखणारे, नोटीस देणारे पोलीस उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, शरद पवार, अजित पवार यांना नोटीस देणार का? पुणे कोणाच्या बापाची जहागिरी नाही, अशी टीका मजलीस ए इत्तेहादुल मुस्लमीन पक्षाचे (एमआयएम) राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मंगळवारी येथे केले. एमआयएम आणि रिपब्लिकन युवा मोर्चाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ओवेसी यांची जाहीर सभा टिंबर मार्केट परिसरात झाली. त्यावेळी ते बोलत होते. पक्षाचे नेते अंजुम इनामदार, शहराध्यक्ष जुबेर शेख, रिपब्लिकन युवा मोर्चाचे नेते राहुल डंबाळे, मिलिंद अहिरे, शैलेंद्र भोसले यांच्यासह शहराच्या विविध भागांतील उमेदवार उपस्थित होते. युवकांची मोठी गर्दी सभेसाठी झाली होती.पुणे पोलिसांनी ओवेसी यांच्या सभेसाठी परवानगी नाकारली होती. त्या पार्श्वभूमीवर झालेल्या सभेत ओवेसी म्हणाले, दोन वर्षांपूर्वी सभा झाली, तेव्हा मला रोखले गेले नाही. पालिका निवडणुकांसाठी मी येत आहे, असे दिसताच प्रक्षोभक वक्तव्याच्या, समाजात दुही पाडत असल्याच्या आणि जिवाला धोका असल्याच्या कारणावरून मला खडक पोलिसांनी विमानतळावरच नोटीस बजावली. सोलापूर, नागपुरात आज माझ्या सभा रोखल्या गेल्या नाहीत, मग पुण्यातच हा प्रकार का? मी कोणत्याही धर्माच्या विरोधात बोलत नाही. मला मुस्लिम असल्याचा अभिमान आहे, पण मी हिंदुंच्या विरोधात नाही. अन्याय, दु:ख, दारिद्र्य यावर बोलतो. माझे प्राण गेले तरी चालतील. मी हिंदुस्थानी जगतात चालणाऱ्या गैरप्रकारांविरुद्ध आवाज उठवत राहीन. ओवेसी यांनी शरद पवार, अजित पवार यांच्यावर टीका केली. कॅशलेस इकॉनॉमीच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयावरही त्यांनी टीका केली. मोहसीन शेख याच्या खुन्यांना जामीन मिळतो, त्याबद्दल सरकारने सर्वोच्च न्यायालयात दादा मागवी. खुन्यांना फाशी द्यावी, अशी मागणी ओवेसी यांनी केली. (प्रतिनिधी)