लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : राज्य मंडळातर्फे दहावीचा आॅनलाइन निकाल जाहीर करण्यात आला असून, पुणे विभागाचा निकाल ९१.९५ टक्के लागला आहे. यंदासुद्धा विभागात पुणे जिल्हा निकालात आघाडीवर आहे. पुणे जिल्ह्याचा निकाल ९२.७४ टक्के असून अहमदनगर जिल्ह्याचा ९०.०९ टक्के तर सोलापूर जिल्ह्याचा निकाल ९२.४७ टक्के लागला आहे. दहावीच्या परीक्षेसाठी २ लाख ७३ हजार ४४४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील २ लाख ७२ हजार ४८९ विद्यार्थी प्रविष्ट झाले. प्रविष्ठ विद्यार्थ्यांपैकी २ लाख ५० हजार ५६२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ९१.९५ टक्के आहे. विभागातील ७३७ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला असून ३ शाळांचा निकाल शून्य टक्के लागला आहे. पुणे जिल्हातील 388 शाळांचा निकाल १०० टक्के आहे तर २ शाळांचा निकाल शून्य टक्के आहे.पुणे जिल्ह्यातून १ लाख ४२ हजार ६१४ विद्यार्थ्यांनी परीक्षेस नोंदणी केली होती.त्यातील १ लाख ४२ हजार १६१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यात ७९ हजार २२३ मुलांचा तर ६२ हजार ९३८ मुलींचा समावेश होता. जिल्ह्यातील १ लाख २६ हजार ९५९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पुणे शहराच्या पूर्व पश्चिम भागातील ३९६ शाळांमधून प्रविष्ठ झालेल्या ४८ हजार २६७ विद्यार्थ्यांपैकी ४२ हजार ०३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात उत्तीर्ण मुलांची संख्या २१ हजार ६४० असून उत्तीर्ण झालेल्या मुलींची संख्या २० हजार ३९३ आहे.
विभागात पुणे जिल्हा अव्वल
By admin | Updated: June 14, 2017 04:01 IST