शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणात पुणे जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:19 IST

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात ४ फेब्रुवारीपर्यंत एकूण ३५८२३ आरोग्य कर्मचा-यांना कोरोनाची लस देण्यात आली. कोरोना लसीकरणामध्ये राज्यात ...

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात ४ फेब्रुवारीपर्यंत एकूण ३५८२३ आरोग्य कर्मचा-यांना कोरोनाची लस देण्यात आली. कोरोना लसीकरणामध्ये राज्यात पुणे जिल्ह्याचा तिसरा क्रमांक लागतो. मुंबई उपनगर पहिल्या क्रमांकावर, ठाणे दुस-या तर पुणे तिस-या क्रमांकावर आहे. यामध्ये पुणे ग्रामीणमध्ये १५२७६, पुणे महापालिका हद्दीत १२८५६, तर पिंपरी चिंचवडमध्ये ७६९१ जणांना लसीकरण करण्यात आले.

लसीकरणानंतर होणारे विपरीत परिणाम तुरळक प्रमाणात आढळून आलेले आहेत. १६ जानेवारीला लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यास सुरुवात झाली. त्यानंतर १५ दिवसांनीही लसीकरणाचा टक्का कमी का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. राज्यात कोरोना लसीकरणामध्ये पुणे जिल्हा तिस-या क्रमांकावर आहे. नावनोंदणी झालेल्या आणि मेसेज येणा-या आरोग्य कर्मचा-यांना लसीकरणासाठी उपस्थित राहणे जमत असल्या अथवा नसल्याबाबत रिप्लाय देण्याची सुविधा नसल्याने काहीसा गोंधळ निर्माण होत असल्याची परिस्थिती आहे.

लसीकरणासाठी तयार केलेली संगणक प्रणाली, कोविन अ‍ॅपमधील गोंधळ यामुळे लसीकरणाचा टक्का वाढण्यात अद्याप यश आलेले नाही. उर्वरित लाभार्थ्यांना १४ फेब्रुवारीपूर्वी लस देण्याच्या सूचना राज्य सरकारकडून देण्यात आल्या आहेत. कोरोना लसीकरण मोहिमेकरता लागणारे डोस पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून ५३ ठिकाणी सत्रे नियोजित करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

-------------------------

जिल्ह्यात आतापर्यंत झालेले लसीकरण

विभागलाभार्थी

पुणे ग्रामीण १५२७६

पुणे शहर १२८५६

पिंपरी चिंचवड ७६९१

-----------------------------

एकूण ३५८२३

-------------------------------------

कुठे किती लसीकरण?

जिल्हा लसीकरण

मुंबई उपनगर ४१३२६

ठाणे ३७३४९

पुणे ३५८२३

मुंबई २०५९०

नागपूर १८१८२

------------------

गुरुवारी, ४ फेब्रुवारी रोजी व्हिडीओ कॉन्फसन्सिंगद्वारे बैठक पार पडली. राज्य शासनाकडे लसीचे डोस पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून, जिल्ह्याला दुसरा साठा मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही, असे आश्वासन देण्यात आले आहे.

- डॉ. अशोक नांदापूरकर, जिल्हा शल्य चिकित्सक