शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

बारामती अशोकनगरमधील प्रस्तावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:10 IST

बारामती: शहरातील अशोकनगर या उच्चभ्रू वसाहतीमधील प्रस्तावित कोविड केअर सेंटरला स्थानिक नागरिकांनी विरोध केला आहे. या भागात दाट लोकवस्ती ...

बारामती: शहरातील अशोकनगर या उच्चभ्रू वसाहतीमधील प्रस्तावित कोविड केअर सेंटरला स्थानिक नागरिकांनी विरोध केला आहे. या भागात दाट लोकवस्ती आहे. तसेच परिसरात ज्येष्ठ नागरिक,लहान मुलांची संख्या अधिक असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. परिणामी हा परिसर संक्रमित होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. हे रुग्णालय सुरू करण्यासाठी नगरपालिकेसह, चीफ फायर ऑफिसर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांची ना हरकत प्रमाणपत्रे उपलब्ध नाही,त्यानंतर देखील पोलीस बंदोबस्तात रुग्णालयाचे सामान आणले जात आहे. ६ एप्रिल रोजी संकल्प मेडीकल न्युट्रीशन थेरपी हॉस्पिटल या नावाचे कोणतेही हॉस्पिटल अशोकनगर भागात अस्तित्वात व कार्यरत नाही. तरीदेखील हे हॉस्पिटलचे अधिग्रहण करण्याचा आदेश उपविभागीय अधिका-यांकडून मिळविलेला आहे.परिसरातील रस्ता अरुंद आहे,त्यातुन वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता आहे. अग्निशमन विभागाची परवानगी नाही, आग लागून दुर्घटना घडल्यास कोण जबाबादारी घेणार, रस्त्याच्या रुंदीच्या निकषात रुग्णालय बसत नाही, इमारत जुनी व जीर्ण झालेली आहे अशा विविध कारणांमुळे हे सेंटर होऊ नये, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.निवासी भागात हे सेंटर उभे करण्यास या भागातील लोकांचा विरोध असून येथे हे सेंटर उभारू नये असे निवेदन उपविभागीय अधिका-यांना देण्यात आले आहे.