शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
3
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
4
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
5
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
6
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
7
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
8
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
9
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
10
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
11
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

सोशल मीडियावर प्रचाराची धूम

By admin | Updated: February 16, 2017 03:40 IST

तंत्रज्ञानाच्या युगात आता निवडणुका आणि प्रचारही हायटेक झाल्याचे चित्र यंदाच्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणूक रणसंग्रामात

पुणे : तंत्रज्ञानाच्या युगात आता निवडणुका आणि प्रचारही हायटेक झाल्याचे चित्र यंदाच्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणूक रणसंग्रामात पहायला मिळत आहे. प्रचारपत्रके, घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी, रिक्षांतून आणि फलकांद्वारे प्रचाराबरोबरच राजकीय पक्षांकडून सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. पक्षांतील प्रमुख नेत्यांची भाषणे, जाहीरनामे, पक्षाच्या कामांची प्रसिद्धी आदी बाबी फेसबुक पेजवर अपलोड केल्या जात आहेत.उमेदवारांचा जोरदार प्रचार व्हावा, यासाठी राजकीय पक्षांतर्फे आयटी सेल स्थापन करण्यात आले आहेत. या सेलद्वारा फेसबुक पेज, टिष्ट्वटर आदी माध्यमांतून अपडेट अपलोड केले जात आहेत. या अपडेटना सामान्यांचाही भरघोस प्रतिसाद मिळत आहे. मुक्त व्यासपीठ असलेल्या सोशल मीडियावरुन मतदारांकडून कमेंटच्या माध्यमातून कधी शाबासकीची थाप, तर कधी कानपिचक्याही काढल्या जात आहेत.भारतीय जनता पक्षाच्या फेसबुक पेजवर जाहीरनामा विस्तृत स्वरूपात अपलोड करण्यात आला आहे. ‘निष्क्रियतेची १० वर्षे’ अशा टॅगखाली पुणे महानगरपालिकेने आजवर नागरी समस्यांबाबत कशा प्रकारे उदासिनता दाखवली, यावर बोट ठेवले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचारसभा, प्रमुख उमेदवारांची माहिती, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण आदी माहिती यामध्ये अपलोड करण्यात आली आहे. ‘हसू फुललं, कमळ उमललं’ अशा ओळींमधून पक्षाचा प्रचार केला जात आहे.‘पुणेकरांचा विश्वास, हाच राष्ट्रवादीचा, श्वास’ अशी टॅगलाईन वापरत राष्ट्रवादी काँग्रेसने प्रचाराचा धुरळा उडवला आहे. ‘होय! राष्ट्रवादीने हे केलं’ अशा मथळ्याखाली ई-लर्निंग, मॉडेल स्कूल, बचतगट आदी कामांची प्रसिद्धी करणारे व्हिडीओ अपलोड केले आहेत.