शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

प्रचाराच्या तोफा आज थंडावणार

By admin | Updated: October 13, 2014 00:36 IST

कालचे मित्र आजचे शत्रू होऊन समोरासमोर ठाकले. एका रात्रीत प्रस्थापित पक्षातील भ्रष्टाचाराचे आरोप असलेले उमेदवार पवित्र होऊन दुसरा झेंडा हातात घेतानाही मतदारांनी पाहिले आहेत.

पुणे : कालचे मित्र आजचे शत्रू होऊन समोरासमोर ठाकले. एका रात्रीत प्रस्थापित पक्षातील भ्रष्टाचाराचे आरोप असलेले उमेदवार पवित्र होऊन दुसरा झेंडा हातात घेतानाही मतदारांनी पाहिले आहेत. इतकेच काय भाऊबंदकीची टाळीही मतदारांनी ऐकली आहे. आता या गदारोळातच मतदानाची घटिका समीप आली असून, उमेदवारांच्या पारण्याच्या वरातींचा आवाजही आज शांत होत आहे. बुधवारी (दि. १५) मतदान होणार असल्याने सोमवारी (दि. १३) सायंकाळी सहा वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. सोमवारी सायंकाळनंतर आचारसंहिता लागू होणार असल्याने कोणत्याही प्रकारचा जाहीर प्रचार, मिरवणुका तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे प्रचार करता येणार नाही. निवडणुकीचे एक्झिट पोलचे निष्कर्ष प्रसारित करण्यावरही प्रतिबंध असेल. त्यामुळे रविवारचा सुट्टीचा दिवस साधत उमेदवारांनी रॅली, पदयात्रा, गाठीभेटींद्वारे अधिकाधिक मतदारांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख २७ सप्टेंबर होती. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या तीन दिवस आधी कॉंग्रेस-राष्ट्रवादी व भारतीय जनता पक्ष-शिवसेना युती तुटली. त्यामुळे अनेकांना अचानकच उमेदवारीची लॉटरली लागली असली तरी त्यांच्याकडे प्रचारासाठी फक्त पंधरा दिवस होते. कमी कालावधीत जास्तीत जास्त प्रचार करण्याचे आव्हान उमेदवारांसमोर होते. तसेच काल गळ््यात गळे घालून फिरलेल्या मित्रपक्षांशी राजकीय शत्रूत्व घेण्याची वेळ उमेदवारांवर आली. ही राजकीय उलथापालथ लक्षात घेऊन उमेदवारांनी अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न केले. आपले वेगळेपण ठसविण्यासाठी एलईडी स्क्रिन, व्हॉट्स अ‍ॅप, इलेक्ट्रॉनिक मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्यात आला. त्यासाठी कुशल व्यक्तींची मदत देखील घेण्यात आली. उमेदवारांपासून ते विविध पक्षांनी मोठ्या प्रमाणावर जाहीरातबाजी करीत शहरातील नाके, ग्रामीण भागातील पार ते आधुनिक सोशल कट्ट्यावर चर्चेचा धुराळा उडवून दिला होता. कमी कालावधीत अनेक सभा घेण्यसाठी हेलिकॉप्टरचा वापरही मोठ्या प्रमाणावर करण्यात आला. (प्रतिनिधी)