शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची निविष्ठेची अडचण मिटणार

By admin | Updated: May 18, 2017 05:41 IST

सध्या पुणे विभागातील निविष्ठा विक्रेत्यांना खताचा ६१ हजार मेट्रिक टन, तर २४ हजार ४६ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा करण्यात आला आहे. खरीप हंगामासाठी आवश्यक

- लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : सध्या पुणे विभागातील निविष्ठा विक्रेत्यांना खताचा ६१ हजार मेट्रिक टन, तर २४ हजार ४६ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा करण्यात आला आहे. खरीप हंगामासाठी आवश्यक असलेल्या निविष्ठांचा पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे या महिनाअखेरपर्यंत मोठ्या प्रमाणात पुरवठा होणार असून, शेतकऱ्यांना निविष्ठाच्या अडचणी येणार नाही, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. पुणे विभागात खरिपाचे सात लाख ८८ हजार ४८० हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी पुणे जिल्ह्यात दोन लाख ३० हजार ८३० हेक्टर, सोलापूरमध्ये ८९ हजार ०२० हेक्टर क्षेत्र व नगर जिल्ह्यात ४ लाख ७८ हजार ६४० आहे. पैकी चालू वर्षी खरिपाची पेरणी मोठ्या प्रमाणात होण्याचा अंदाज आहे. खरिपासाठी सात लाख २० हजार ३७९ मेट्रिक टन खताची, तर एक लाख २३ हजार ७८०क्विंटल बियाण्यांची मागणी कृषी विभागाकडे आली होती. कृषी विभागाने गावपातळीवरच्या निविष्ठा विक्रेत्यामार्फत निविष्ठाचा पुरवठा करण्यास सुरुवात गेल्या महिन्यापासून केली आहे. पुणे विभागात यंदा आत्तापर्यंत झालेल्या खताच्या पुरवठ्यामध्ये पुणे २४ हजार, नगर १९ हजार व सोलापूर जिल्ह्यात १८ हजार मेट्रिक टन खताचा पुरवठा झाला आहे. तसेच, बियाण्यांचा महाबीज, राष्ट्रीय बीज निगम व खासगी कंपन्यांकडून पुरवठा करण्यात येत आहे. आत्तापर्यंत विभागातील नगर जिल्ह्यात १४ हजार २४८ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा झाला आहे. पुणे जिल्ह्यात ६ हजार ३९७, सोलापूर जिल्ह्यात तीन हजार ४०१ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा झाला आहे. मागील वर्षी रब्बी हंगामात पुरवठा करण्यात आलेल्या रासायनिक खतापैकी पुणे विभागात सुमारे एक लाख ४८ हजार १५० मेट्रिक टन खत शिल्लक आहे. त्यामुळे या खताचा वापर यावर्षी खरीप हंगामासाठी करता येऊ शकणार आहे. पुणे जिल्ह्यात ४३ हजार ९६२, नगर २६ हजार ५६७ व सोलापूर ७७ हजार ६२१ मेट्रिक टन खते शिल्लक आहेत. यामध्ये युरिया, डीएपी, एस.एस.पी, एमओपी आणि संयुक्त खताचा समावेश आहे.