शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
3
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
4
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
5
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
6
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
7
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
8
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
9
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
10
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
11
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
12
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
13
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
14
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
15
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
16
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
17
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
18
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
19
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
20
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...

प्राचार्यांना निवडणुकांची धास्ती

By admin | Updated: April 29, 2017 04:26 IST

महाविद्यालयातील विद्यार्थी निवडणुकांमुळे २३ वर्षांनंतर पुन्हा मारामाऱ्या, अपहरण, खून अशा घटनांना

पुणे : महाविद्यालयातील विद्यार्थी निवडणुकांमुळे २३ वर्षांनंतर पुन्हा मारामाऱ्या, अपहरण, खून अशा घटनांना महाविद्यालयास सामोरे जावे लागेल याची धास्ती प्राचार्यांनी घेतली आहे. निवडणुकांचे परिनियम तयार करताना महाविद्यालयांना पुरेसा पोलीस बंदोबस्त पुरविणे कायद्याने बंधनकारक करावे अशी मागणी काही प्राचार्यांनी समितीकडे केली आहे.महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ नुसार महाविद्यालयांमध्ये व विद्यापीठांच्या विभागांमध्ये निवडणुका घेण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार सर्व महाविद्यालये व विद्यापीठांच्या विभागांना निवडणुका घेणे बंधनकारक आहे. निवडणुकांचे परिनियम तयार करण्यासाठी उत्तर महाराष्ट्र जळगाव विद्यापीठाचे माजी कुलगुरू आर. एस. माळी यांची समिती स्थापन करण्यात आली. या समितीला निवडणुका शांततेत व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी बारीक -सारीक तपशील तयार करावे लागणार आहेत. आगामी शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर आॅगस्ट-सप्टेंबर महिन्यात या निवडणुका पार पाडाव्या लागणार आहेत. महाविद्यालयांची सुरुवातीची दोन महिने अभ्यासक्रम सोडून निवडणुकींच्या गदारोळात जाणार आहेत. या निवडणुकांची रणधुमाळी कशी निभावून न्यायची असा यक्षप्रश्न अनेक प्राचार्यांना पडला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या राजकीय निवडणुकांना मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त पुरविण्यात येतो. तितका बंदोबस्त प्रत्येक महाविद्यालयाच्या निवडणुकीसाठी उपलब्ध होऊ शकेल का, अशी चिंता त्यांना सतावत आहे. निवडणुकांचे परिनियम तयार करताना याबाबतची योग्य तरतूद करावी अशी मागणी समितीकडे करण्यात आली आहे. त्यावर समितीमधील सदस्यांकडून विचार करण्यात येत आहे. महाविद्यालयातील निवडणुकांमध्ये विद्यार्थी संघटनांच्या आडून होणारा राजकारण्यांचा अतिरेकी हस्तक्षेप, गुंडागर्दी, मारामारी अशा घटना मोठ्या प्रमाणात घडू लागल्याने १९९४मध्ये या निवडणुका बंद करण्यात आल्या. त्यानंतर वर्गात सर्वप्रथम आलेल्या विद्यार्थ्यांची वर्गप्रतिनिधी म्हणून निवड केली जाऊ लागली. या वर्गप्रतिनिधींमधून कॉलेज प्रतिनिधी निवडले जात होते. मात्र आता या निवडी विद्यार्थ्यांच्या मतदानाने होणार आहेत. महाविद्यालय पातळीवर एक विद्यार्थी परिषद असणार आहे. या परिषदेचा सभापती, सचिव, एक महिला प्रतिनिधी, एक मागास प्रवर्गातील प्रतिनिधी, प्रत्येक वर्गातील एक प्रतिनिधी, कुलगुरूंकडून नामनिर्देशित करण्यात आलेले एनएसएस, एनसीसी, क्रीडा आणि सांस्कृतिक कार्ये यामधील प्रत्येक एक प्रतिनिधी यांची मिळून ही विद्यार्थी परिषद बनणार आहे. निवडणुकीच्या कालावधीमध्ये हजेरीपटावरील विद्यार्थी वगळता कोणालाही निवडणूक प्रक्रियेत भाग घेता येणार नाही. विद्यार्थी परिषदेच्या बैठकीसाठी एक तृतीयांश सदस्यांची गणपूर्ती आवश्यक असणार आहे.