पुणे : बेकायदा हुक्का पार्लर सुरु असलेल्या हॉटेलवर वानवडी पोलिसांनी छापा टाकून हॉटेल चालकाला अटक केली आहे. तर हॉटेल मालक पसार झाला आहे. ज्या हॉटेलमध्ये हे हुक्का पार्लर सुरु होते ते हॉटेलही बेकायदा असल्याचे पोलिसांनी सांगितले.स्वामी चिनय्या ईरी (वय ३१, रा. पफ रोड, घोरपडी) असे अटक हॉटेल चालकाचे नाव आहे. तर हॉटेल मालक सैय्यद रेजा अजदर (वय ४५, ५0१ रा. रमा मेजिस्टेट, कोंढवा) हा पसार झाला आहे. वानवडी येथील साळुंके विहार रस्त्यावर शुगर अॅन्ड स्पायसी हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये बेकायदा हुक्का पार्लर सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून ३ हजारांचे हुक्का साहित्य जप्त केले. या हॉटेलला पोलीस परवाना नाही. (प्रतिनिधी)
हुक्का पार्लरवर छापा
By admin | Updated: August 4, 2014 04:25 IST