शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आदेश झुगारला; वेल्ह्याच्या सभापतींनी टोचली लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजकारण्यांनी लसीकरण करून घेण्याची गडबड करू नये, तसेच आपल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजकारण्यांनी लसीकरण करून घेण्याची गडबड करू नये, तसेच आपल्या पदाचा फायदा घेऊ नये हे स्पष्ट केलेले असतानाच शासनाचा आदेश डावलून थेट पंचायत समितीच्या सभापतींनीच लसीकरण करून घेण्याचा प्रकार पुण्यात उघडकीला आला आहे. महत्त्वाचे म्हणजे यांनी चक्क नोंदणी करून ही लस मिळवली आहे.

वेल्हा पंचायत समितीचे सभापती आणि काँग्रेस नेते दिनकर सरपाले यांनी हे लसीकरण करून घेतले आहे. पंचायत समिती मधील सर्व फ्रंटलाईन वर्कर्सचे लसीकरण संपल्याने आपल्यासह आणखी चारपाच जणांचे लसीकरण करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.

सरकारने आरोग्य कर्मचाऱ्यांशिवाय कोणालाही लस देण्यास मनाई केली असताना सभापतींना लस मिळाली कशी ? असा सवाल आता विचारला जातो आहे. याप्रकरणी आता जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून संबंधितांना शोकाॅज नोटीस बजावण्यात आली आहे.

सरकारतर्फे आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. यासाठी सरकारकडून एक प्लॅन तयार करण्यात आला आहे. यात सुरुवातीला आरोग्य कर्मचारी- फ्रंटलाईन वर्कर्स तर त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण होणार आहे. पण, गंमत म्हणजे आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण होण्यापूर्वीच वेल्ह्यातल्या पंचायत समितीच्या सभापतींनी आपले लसीकरण करून घेतले आहे. महत्त्वाचे म्हणजे या लसीकरणाचे त्यांनी फोटोसेशनही करून घेतले आहे.

याबाबत त्यांना विचारले असता सरपाले म्हणाले, “आठ दिवसांपूर्वी पंचायत समितीमध्ये माझ्याकडून कागदपत्रे मागवण्यात आली होती. त्यानंतर मला एसएमएस आला आणि मग माझे लसीकरण करण्यात आले. मी एकट्याने नाही तर माझ्या सोबत आणखी तीनचार जणांचेही लसीकरण झाले आहे.”

पण ही लस मिळाली कशी, हे विचारले असता सरपाले म्हणाले, “आमच्या कडच्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण संपले होते. त्यामुळे आमचे लसीकरण करण्यात आले. रितसर नोंदणी करून हे लसीकरण केले आहे. मी सभापती असल्याने हे लसीकरण करण्यात आले आहे.” दरम्यान, या प्रकरणी चौकशी करण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱी डाॅ. राजेश देशमुख यांनी स्पष्ट केले. तर या पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना तसेच सभापतींना आता शो काॅज नोटीस देखील बजावण्यात आली आहे.”

कोट

याप्रकरणी मी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला आहे. अहवाल आल्यावर पुढचा निर्णय घेतला जाईल.

- डॅा. राजेश देशमुख , जिल्हाधिकारी

चौकट

पंचायत समितीकडूनच त्यांची माहिती भरली गेली होती. सभापतींसह चार जणांची ही माहिती भरलेली होती. त्यातून ही लस देण्यासाठी त्यांना बोलवले गेले. मात्र, हे फोटो पाहिल्यानंतर ही बाब लक्षात आल्याने तातडीने उर्वरित लोकांचे लसीकरण थांबवण्यात आले अशी माहिती तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे.

फोटो : वेल्हा पंचायत समितीत कोरोनालस घेताना वेल्हा पंचायत समिती सभापती दिनकर सरपाले व त्यांचे कार्यकर्ते.