शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

जैन श्वेतांबर मंदिरात पुजाऱ्याकडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:10 IST

बारामती: येथील जैन श्वेतांबर मूर्तीपूजक संघाच्या जैन मंदिरात पुजारी (पंडित) म्हणून काम करणाऱ्या रणजितसिंह वदेसिंगभाई बारिया (रा. खरेटी. पो. ...

बारामती: येथील जैन श्वेतांबर मूर्तीपूजक संघाच्या जैन मंदिरात पुजारी (पंडित) म्हणून काम करणाऱ्या रणजितसिंह वदेसिंगभाई बारिया (रा. खरेटी. पो. पारखंडा, ता. हालोल, जि. पंचमहाल, गुजरात) यांनी २ लाख १० हजार रुपयांचा अपहार करत फसवणूक केल्याची घटना घडली.

याप्रकरणी संघाचे सचिव दिलीप जयंतीलाल दोशी यांनी फिर्याद दिली. फेब्रुवारी महिन्यात ही घटना घडली. परंतु संघाच्या काही पदाधिकाऱ्यांना दरम्यानच्या काळात कोरोनाची लागण झाल्याने याबाबत १ एप्रिल रोजी फिर्याद दाखल करण्यात आली.येथील मंदिररात गेल्या सहा-सात वर्षांपासून बारिया हे पंडित म्हणून काम करतात. भाविकांनी दिलेल्या दानाचा हिशोब ठेवणे, रोजचे धार्मिक पूजापाठाचे काम करणे अशी कामे ते करत होते. संघातील पदाधिकारी, सदस्यांचा त्यांनी विश्वास संपादन केला होता. त्यामुळे मंदिराच्या चाव्यादेखील त्यांच्याकडे सोपवल्या होत्या.१५ फेब्रुवारी रोजी तो जैन श्वेतांबर मंदिराच्या व दान पेटीच्या चाव्या अंहिसा भवन येथील खोतील ठेवून निघून गेला. पदाधिकाऱ्यांना मंदिर बंद दिसल्याने बारिया राहत असलेल्या खोलीत ते गेले असता तेथे चाव्या दिसल्या. फिर्यादीने ही बाब संघाच्या पदाधिकाऱ्यांना कळविली. त्यानंतर हिशोबाच्या वह्या व अन्य बाबी तपासण्यात आल्या असता २ लाख १० हजार रुपयांचा अपहार करत फसवणूक केल्याचे लक्षात आले. त्यानुसार फिर्याद दाखल करण्यात आली.