शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
4
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
5
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
6
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
7
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
8
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
9
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
10
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
11
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
12
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
13
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
14
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
15
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
16
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
17
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
18
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
19
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
20
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
Daily Top 2Weekly Top 5

टोमॅटो, फ्लॉवर, कोबी, घेवडा, मटारचे दर पडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुण्यासह राज्यात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका बसल्याने रविवारी मार्केट यार्डात कांदा व बटाट्याची आवक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पुण्यासह राज्यात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका बसल्याने रविवारी मार्केट यार्डात कांदा व बटाट्याची आवक कमी झाली. यामुळे कांद्याच्या दरात वाढ झाली. तर

फळभाज्यांची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेत वाढल्याने टोमॅटो, फ्लॉवर, कोबी, घेवडा आणि परराज्यातील मटारच्या दरात घट झाली. अन्य सर्व फळभाज्यांचे भाव स्थिर होते.

गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील तरकारी विभागात रविवार (दि.१०) रोजी १०० ट्रक शेतीमालाची आवक झाली. परराज्यातून आलेल्या मालामध्ये राजस्थान येथून ९ ते १० ट्रक गाजर, गुजरात आणि कर्नाटकातून ४ ते ५ टेम्पो कोबी, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूतून ४ ते ५ टेम्पो शेवगा, गुजरात, मध्य प्रदेश आणि कर्नाटकातून १० ते १२ टेम्पो हिरवी मिरची, मध्य प्रदेशातून मटार १५ ते १६ ट्रक, मध्य प्रदेश आणि गुजरामधून ५ ते ६ ट्रक लसूण, आग्रा, इंदौर आणि स्थानिक परिसरातून बटाट्याची ३० ट्रक इतकी आवक झाली आहे़

स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले ११०० ते १२०० गोणी, कोबी सुमारे ५ ते ६ टेम्पो, प्लॉवर ८ ते १० टेम्पो, भेंडी ७ ते ८ टेम्पो, गवार ५ ते ६ टेम्पो, सिमला मिरची १० ते १२ टेम्पो, टोमॅटो १० ते १२ हजार पेटी, भुईमुग शेंगा ७० ते ८० पोती, तांबडा भोपळा ८ ते १० टेम्पो, हिरवी मिरची ३ ते ४ टेम्पो, गवार ५ ते ६ टेम्पो, कांदा १०० ट्रक इतकी आवक झाली.

--

भाजीपाला घाऊक दर किरकोळ दर

कांदा २२-३५ ३०-५०

बटाटा १५-२५ २०-३५

टोमॅटो ०६-०८ १०-१५

भेंडी २०-३० २४-४०

गवार ३९-४० ४०-५०

मिरची २०-२५ २५-३०

कोथिंबीर ०७-१० १०-१५

मेथी ०७-०८ १०-१५

मटार १५-२० २५-३०

--

मेथी, शेपू, कांदापात, चाकवत, चुका, चवळई आणि पालकाचे घटले

मार्केट यार्डात आवक वाढल्यामुळे मेथी, शेपू, कांदापात, चाकवत, चुका, चवळई आणि पालकच्या भावात घट झाली आहे, तर मागणी वाढल्यामुळे कोथिंबीर, राजगिरा आणि हरभरा गड्डीच्या भावात वाढ झाली असून शेपू, करडई, पुदीना, अंबाडी आणि मुळे यांचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

घाऊक बाजारात मेथीचे दर २ रुपये, कांदापात ६ रुपये, चाकवत ३ रुपये, चुका ४ रुपये, चवळई ६ रुपये आणि पालक ४ रुपयांनी जुडीमागे उतरले आहेत. तर कोथिंबीर, राजगिरा आणि हरभरा गड्डीचे दर प्रत्येकी एक रुपयांनी वाढले आहेत. येथील बाजारात रविवारी कोथिंबीरीची दीड लाख, मेथीची १ लाख तर हरभरा गड्डीचे ५० हजार जुडींची आवक झाली.

--

आवकाळी पावसामुळे कांद्याची आवक घटली

पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी आवकाळी पाऊस झाला. याचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. रविवारी मार्केट यार्डात कांद्याची आवक कमी झाली. यामुळेच नवीन कांद्याच्या दरात काही प्रमाणात वाढ झाली. यंदा पावसाचा मोठा फटका कांदा पिकाला बसला आहे. यामुळे पुढील काही दिवस दरात सतत चढ-उतार होत राहील.

- रितेश पोमण, कांद्याचे व्यापारी