शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

कांदा, बटाटा, शेवगा व लसणाचे दर उतरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:09 IST

पुणे : उन्हाळा कडक होत असला, तरी अद्यापही बाजारात भाजीपाल्याची आवक स्थिर आहे. परंतु कांदा, बटाटा, लसूण आणि शेवग्याची ...

पुणे : उन्हाळा कडक होत असला, तरी अद्यापही बाजारात भाजीपाल्याची आवक स्थिर आहे. परंतु कांदा, बटाटा, लसूण आणि शेवग्याची आवक वाढल्याने व मागणी स्थिर असल्याने दरामध्ये घसरण झाली. तर आवक कमी झाल्याने मटारचे दर वाढले. अन्य सर्व फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी दिली.

गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील तरकारी विभागात रविवार (दि.२१) रोजी ९० ट्रक शेतीमालाची आवक झाली. यात प्रामुख्याने परराज्यातून आलेल्या मालामध्ये राजस्थान येथून ५ ते ६ टेम्पो गाजर, गुजरात आणि कर्नाटकातून ४ ते ५ टेम्पो कोबी, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूतून ५ ते ६ टेम्पो शेवगा, गुजरात, कर्नाटक व आंध्र प्रदेशातून ८ ते १० टेम्पो हिरवी मिरची, तामिळनाडू आणि कर्नाटकातून तोतापुरी कैरी ५ ते ६ टेम्पो, हिमाचल प्रदेशातून मटार ३ ट्रक, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून १४ ते १५ ट्रक लसूण, आग्रा, इंदौर आणि स्थानिक परिसरातून बटाट्याची ४५ ते ५० ट्रक इतकी आवक झाली आहे.

स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले १३०० ते १४०० गोणी, कोबी सुमारे ५ ते ६ टेम्पो, प्लॉवर ८ ते १० टेम्पो, भेंडी ६ ते ७ टेम्पो, गवार ४ ते ५ टेम्पो, सिमला मिरची ८ ते १० टेम्पो, टोमॅटो ७ ते ८ हजार पेटी, तांबडा भोपळा ४ ते ५ टेम्पो, हिरवी मिरची ३ ते ४ टेम्पो, पावटा ४ ते ५ टेम्पो, मटार २०० गोणी, भुईमूग शेंग ३० ते ४० गोणी, गावरान कैरी ४ ते ५ टेम्पो, कांदा ७० ते ८० ट्रक इतकी आवक झाली.

--------

भाजीपाला घाऊक दर किरकोळ दर

कांदा १०-१३ १५-२५

बटाटा ०८-१३ १५-३०

लसूण ३०-६० ४०-७०

शेवगा १०-२० २०-४०

टोमॅटो ०५-१० १५-२५

भेंडी २५-३० ३०-४०

गवार ४०-६० ५०-७०

मिरची ३०-५० ४५-६०

कोथिंबीर ०७-१० १०-१५

मेथी ०४-८० १०-१५

मटार ३५-४० ४०-५०

गाजर १०-१४ १५-२०

---

मेथी, चाकवत, अंबाडी, पालकचे दर वाढले

मार्केटयार्डात रविवारी मेथी, चाकवत, अंबाडी आणि पालकच्या दरात वाढ झाली असून, शेपू आणि चवळईच्या दरात मात्रघट झाली. तर कोथींबीर, कांदापात, करडई, पुदीना, मुळे, राजगिरा, चुका आणि हरभरागड्डीचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

रविवारी मार्केटयार्डात कोथींबीरीच्या दीड लाख ३० हजार जुड्यांची, मेथीची ५० हजार जुड्यांची आवक झाली़ मेथीच्या भावात घाऊक बाजारात गड्डीमागे तीन रुपये, अंबाडी दोन रुपये, चाकवत आणि पालक प्रत्येकी एक रुपयांनी वाढ झाली. तर शेपू आणि चवळईच्या भावात प्रत्येकी दोन रुपयांची घट झाली आहे.