शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

काकडी, फ्लॉवर, मटार आणि पावट्याचे दर वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : बाजारात फळभाज्यांची आवक गेल्या आठवड्याइतकी आहे. मात्र, मागणी वाढल्याने काकडी, फ्लॉवर, मटार आणि पावट्याच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : बाजारात फळभाज्यांची आवक गेल्या आठवड्याइतकी आहे. मात्र, मागणी वाढल्याने काकडी, फ्लॉवर, मटार आणि पावट्याच्या दरात वाढ झाली, तर कांद्याच्या दरात घसरण झाली आहे. अन्य सर्वच फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापारी विलास भुजबळ यांनी दिली.

गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील तरकारी विभागात रविवार (दि. २८) रोजी ८० ते ९० ट्रक शेतीमालाची आवक झाली. यात परराज्यातून आलेल्या मालामध्ये राजस्थान येथून १० टेम्पो गाजर, गुजरात आणि कर्नाटकातून ३ ते ४ टेम्पो कोबी, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूतून ३ ते ३ ते ४ टेम्पो शेवगा, कर्नाटक गुजरात आणि आंध्रप्रदेशातून १० ते १२ टेम्पो हिरवी मिरची, राजस्थान आणि मध्यप्रदेशातून मटार १० ते १२ ट्रक, मध्यप्रदेश आणि गुजरातधून १४ ते १५ ट्रक लसूण, आग्रा, इंदूर आणि स्थानिक परिसरातून बटाट्याची ३० ते ३५ ट्रक इतकी आवक झाली आहे.

स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले १३०० ते १४०० गोणी, कोबी सुमारे ५ ते ६ टेम्पो, फ्लॉवर ८ ते १० टेम्पो, भेंडी ५ ते ६ टेम्पो, गवार ५ ते ६ टेम्पो, सिमला मिरची १० ते १२ टेम्पो, टोमॅटो ७ ते ८ हजार पेटी, तांबडा भोपळा ७ ते ८ टेम्पो, हिरवी मिरची ३ ते ४ टेम्पो, पावटा ३ टेम्पो, मटार ३० ते ४० गोणी, भुईमुग शेंग ३० ते ४० गोणी, गावरान कैरी २ टेम्पो, कांदा ७० ट्रक इतकी आवक झाली.

------

भाजीपाला घाऊक दर किरकोळ दर

कांदा १२-२७ २५-५०

बटाटा ०८-१२ १५-३०

टोमॅटो ०६-१० १५-२५

भेंडी ३०-४५ ४०-५०

गवार ३५-४० ४०-५०

मिरची ३५-५५ ४५-६०

कोथिंबीर ०७-१० १०-१५

मेथी ०३-०७ १०-१५

मटार २५-२६ ४०-५०

गाजर १५-१८ २०-२५

---

पालेभाज्यांचे दर घसरले

मार्केट यार्डात रविवारी कोथिंबीर, कांदापात, करडई, अंबाडी, राजगिरा, हरभरा गड्डीच्या दरात घसरण झाली. तर चुका आणि चवळईच्या दरात वाढ झाली. मेथी, शेपू, पुदीना, मुळे आणि पालकचे दर मात्र स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. रविवारी मार्केटयार्डात कोथिंबिरीच्या पावणेदोन लाख जुड्यांची, मेथीची ७० हजार जुड्यांची तर हरभऱ्याची ८ ते १० हजार गड्डींची आवक झाली.

कोथींबीरीच्या भावात घाऊक बाजारात तब्बल ६ हजार रुपयांची, कांदा पात, चाकवत आणि राजगिऱ्याच्या भावात प्रत्येकी दोन रुपयांची तर करडई आणि अंबाडीच्या दरात प्रत्येकी एक रुपयांची घसरण झाली आहे. तर चुका आणि चवळईच्या भावात प्रत्येकी एक रुपयांनी वाढ झाली आहे.