शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
2
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली
3
पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला
4
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
5
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
6
आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका
7
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?
8
आता खरी बायको कोण? एकाच वेळी ६ पत्नींचा पतीच्या नुकसानभरपाईवर दावा, वन विभाग संभ्रमात
9
"करीना कपूरला नवाब असल्याचा गर्व...", पत्रकार अनिता पाध्ये स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या...
10
सरकारच्या एका निर्णयामुळे २ लाख नोकऱ्या धोक्यात? ४०० कंपन्या बंद होण्याची भीती, कोणी दिला इशारा?
11
'ते व्हिडीओ पाहून तो अस्वस्थ होता म्हणूनच...'; CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या राजेशच्या आईची धक्कादायक माहिती
12
अमेरिकेच्या टॅरिफविरोधात लढण्यासाठी रशिया भारतासोबत! म्हणाले, भारतीय वस्तूंचे स्वागत, तेलही देणार
13
टीम इंडियातील माजी सहकाऱ्यांपैकी कुणी कॉल केला का? पृथ्वी म्हणाला, मला सहानुभूती नकोय!
14
CM-PM आणि मंत्र्यांना पदावरुन हटवण्याचे विधेयक योग्य; शशी थरुर यांचा पाठिंबा
15
वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले
16
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
17
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! १ तोळा सोन्याचा भाव काय? अचानक का घसरले दर?
18
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
19
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
20
₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI?

धनाढ्य असल्याची बतावणी करून गंडा

By admin | Updated: May 21, 2014 01:22 IST

धनाढ्य असल्याचे भासवून रोख खरेदी करायची, शोरूमधील कर्मचार्‍यांचा विश्वास संपादन करायचा आणि नंतरच्या भेटीत महागड्या मोबाईलसाठी तोकडी रक्कम देऊन गायब व्हायचे.

पुणे : धनाढ्य असल्याचे भासवून रोख खरेदी करायची, शोरूमधील कर्मचार्‍यांचा विश्वास संपादन करायचा आणि नंतरच्या भेटीत महागड्या मोबाईलसाठी तोकडी रक्कम देऊन गायब व्हायचे. मोबाईल निम्म्या किमतीला विकून पैसा कमवायचा, अशी कार्यपद्धती असलेल्या चलाख बदमाषासह चौकडीवर चतु:शृंगी पोलिसांनी पाश आवळले. त्यातील २ आरोपींनी अटकपूर्व जामीन मिळविल्याने त्यांना अटक करता आलेली नाही. मनीषकुमार, रिवश, सुशील कुमार आणि रिद्ध राजाधान (गुरगाव, हरयाना) अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणाचा तपास करणारे फौजदार राजाराम चौहान यांनी सांगितले की सुशीलकुमार हा मनीषकुमार आणि रिवश यांचा पिता आहे. श्रीमंत असल्याचे भासवून मोबाईल दुकानात रोख खरेदी करायची, आपला जवळच बंगला असल्याचे सांगायचे, नंतर कर्मचार्‍यांचा विश्वास संपादन करून आणखी खरेदी करायची. त्या वेळी किरकोळ पैसे देऊन बाकीचे पैसे बंगल्यावर येऊन घेऊन जा, असे सांगायचे, गायब होऊन नवे कोरे मोबाईल ओळखीच्या लोकांना कमी किंमतीला विकून माया गोळा करायची, या पद्धतीने या कुटुंबाने फसवेगिरी केली. रिद्ध ही मनीषकुमार याची पत्नी आहे. मनीषकुमार याच्यावर हैदराबाद येथे अनेक गुन्हे दाखल आहेत. पुण्यात कोंढवा, वानवडी या ठिकाणीही गुन्हे दाखल आहेत. औंधमधील क्रोमा शोरूममध्ये ५ लाख ४२ हजार रुपये किमतीचे १५ मोबाईल केवळ ४९ हजार रुपयांत मनीषकुमार याने खरेदी केले. ४ लाख ९२ हजार रुपये मागण्यासाठी शोरूमचा कर्मचारी गेला असता आरोपींचा ठावठिकाणा मिळून आला नाही. याच आरोपींनी आठ ते नऊ जणांना परदेशवारी स्वस्तात, चाळीस टक्के कमी तिकीटदरात घडवून आणण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून ४० लाख ४६ हजार रुपये उकळले. याही प्रकारात स्वखर्चाने काही जणांना परदेशवारी घडवून आणायची आणि नंतर विश्वास संपादन करून कमी किमतीत सहल घडवितो, असे सांगून ११ लाख रुपये जमा करून पोबारा करण्याचे तंत्र वापरले. चौहान यांनी सांगितले की सुशीलकुमार यास अटक केली होती; मात्र त्यास जामीन मिळाला. अन्य आरोपींनी अटकपूर्व जामीन घेतल्याने त्यांना अटक करता आलेली नाही. मात्र, मनीषकुमार याच्यावर देशभरात ४० गुन्हे दाखल आहेत. त्याने बनावट कागदपत्रे तयार केली आहेत. दिल्लीत ३ मोटारी विकल्या आहेत. (प्रतिनिधी)