शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

तक्रार मागे घेण्यासाठी फिर्यादींवर दबाव

By admin | Updated: May 10, 2017 03:43 IST

जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर फेरबदल करून दुबार विक्री प्रकरणात नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर

लोकमत न्यूज नेटवर्कनारायणगाव : जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर फेरबदल करून दुबार विक्री प्रकरणात नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी असलेले मंडलाधिकारी व तलाठी यांनी स्थानिक वाळू ठेकेदार व नातेवाइकांना मध्यस्थी घालून तक्रार मागे घेण्यासाठी दबावतंत्र सुरू केल्याने फिर्यादी यांची मानसिक व शारीरिक अवस्था बिघडली आहे. जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर फेरबदल करून विक्री केल्याप्रकरणी अनिल शंकर कुऱ्हाडे, पुष्पलता कुऱ्हाडे (दोघे रा. आळे) यांच्या सहमंडलाधिकारी दादाभाऊ काळे, तलाठी आर. सी. वामन यांच्यावर नारायणगाव पोलीस ठाण्यात दि.३ रोजी गुन्हा दाखल करण्यात होता. या प्रकरणी राजेंद्र शंकर हांडे (वय ५७, रा. आळेफाटा, ता. जुन्नर, जि. पुणे) यांनी फिर्यादी दिली आहे. अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.या प्रकारामुळे राजेंद्र हांडे यांची प्रकृती गेली ४ दिवसांपासून बिघडली आहे. त्यांच्यावर २००७ साली हृदय शस्त्रक्रिया झाली होती. जमीन फसवणुकीची घटना घडल्यापासून त्याची शारीरिक प्रकृती बिघडली आहे. त्यात हे प्रकरण मिटवून घेण्यासाठी वारंवार दबाव येत असल्याने त्यांचे मानसिक व शारीरिक संतुलन बिघडले आहे. छातीत दुखू लागल्याने काल (दि. ८) त्यांना उपचारासाठी मुंबईला नेण्यात आले आहे. अजूनही हे प्रकरण मिटवून घ्या, असे दररोज फोन येत आहेत, यामुळे आम्ही पूर्णपणे त्रस्त झालो आहेत. पतीची तब्बेत यामुळे बिघडली आहे.