शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

व्यावसायिक प्रवेशासाठी तयार ठेवा ही कागदपत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:09 IST

पुणे: कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक अद्याप प्रसिद्ध झालेले नाही. तसेच, बारावीनंतरच्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षेचे (सीईटी) ...

पुणे: कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक अद्याप प्रसिद्ध झालेले नाही. तसेच, बारावीनंतरच्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षेचे (सीईटी) वेळापत्रकही जाहीर झाले नाही.परंतु, तंत्रशिक्षण विभागाच्या पदविका, पदवी प्रवेशासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे विद्यार्थ्यांनी तयार ठेवावीत, असे आवाहन तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ यांनी केले आहे. त्यामुळे शासनाकडून सीईटी परीक्षा घेतली जाऊ शकते, यास पुष्टी मिळत आहे.

तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे बारावीनंतरच्या अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट ॲण्ड कॅटरिंग टेक्नॉलॉजी पदविका व पदवी अभ्यासक्रम, थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र, वास्तुशास्त्र तसेच एमई अथवा एमटेक, एमसीए, एमबीए या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय प्रवेश प्रक्रियेद्वारे राबविली जाते. प्रवेशासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी सुविधा केंद्रावर केली जाते. ऐनवेळी विद्यार्थ्यांना आवश्यक ती कागदपत्रे उपलब्ध होत नाहीत.त्यामुळे प्रवेशासाठी इच्छुक उमेदवारांनी कागदपत्रे प्राप्त करण्यासाठी आतापासून सुरुवात करावी, असेही तंत्रशिक्षण विभागाने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या पदविका अभ्यासक्रमासाठी जातवैधता प्रमाणपत्र आवश्यक नाही. मात्र, पदवी अभ्यासक्रमासाठी हे प्रमाणपत्र अनिवार्य आहे. अनुसूचित जाती-जमाती व्यतिरिक्त उर्वरित सर्व मागासवर्गीय उमेदवारांसाठी नॉन क्रिमीलेअर बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे सैन्य दलातील अथवा अल्पसंख्याक संवर्गातून प्रवेश घेऊ इच्छिणार्‍या उमेदवारांच्या प्रवेशासाठी आवश्यक ती प्रमाणपत्रे महत्त्वाची आहेत. आरक्षित घटकातील विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र अथवा जात वैधता प्रमाणपत्र योग्य वेळेत न मिळाल्यास त्यांचा प्रवेश खुल्या संवर्गातून निश्चिती केला जाईल, असेही तंत्रशिक्षण संचालनालयने स्षष्ट केले आहे.

................

व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आवश्यक कागतपत्रे

१) जात प्रमाणपत्र

२) जात वैधता प्रमाणपत्र

३) नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र

४) डोमिसाईल प्रमाणपत्र

५) उत्पन्नाचे प्रमाणपत्र

६) अपंगत्वाचे प्रमाणपत्र .

७) आधार क्रमांक

८) बँक खाते