शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
7
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
8
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
9
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
10
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
11
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
12
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
13
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
14
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
15
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
16
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
17
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
18
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
19
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
20
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

पूर्ववैमनस्यातून गुन्हेगारावर गोळीबार

By admin | Updated: March 31, 2017 03:26 IST

पूर्ववैमनस्यातून तरुणावर गावठी कट्ट्यामधून गोळीबार करण्यात आल्याची घटना गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास

पुणे : पूर्ववैमनस्यातून तरुणावर गावठी कट्ट्यामधून गोळीबार करण्यात आल्याची घटना गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास एरंडवण्यातील भरत क्रीडा संकुलजवळ घडली. या घटनेत तरुणाच्या पोटामध्ये गोळी लागली असून तो सराईत गुन्हेगार आहे. गोळीबार झाल्यानंतर आसपासच्या परिसरातील नागरिकांनी दहशतीमुळे दुकाने बंद केली. अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी बाबूलाल लक्ष्मण मोहोळ (रा. ओटा वसाहत, गणेशनगर, एरंडवणा), सचिन ऊर्फ बाळा विठ्ठल सोनवणे (रा. वारजे) यांच्याविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निखिल अंकुश गिरी (वय २६, रा. ओटा वसाहत, गणेशनगर, एरंडवणा) यांनी फिर्याद दिली आहे. (प्रतिनिधी)पूर्वीच्या भांडणाच्या रागामधून बाबूलालने २ दिवसांपूर्वी निखिलला फोन करून धमकी दिली होती. त्यानंतर रात्री साडेनऊच्या सुमारास त्याने अलंकार पुलाजवळील देवीच्या मंदिराजवळ बाबूलाल व सोनवणे यांनी पुन्हा वादावादी घालत धमकी दिली. गुरुवारी न्यायालयात जायचे असल्याने निखिल तयार होऊन भरतकुंज क्रीडा संकुलासमोर जाऊन मित्र सचिन जाधव याची वाट पहात उभा होता. संकुलाच्या गेटसमोर उभ्या असलेल्या एका दुचाकीवर तो बसलेला असताना पाठीमागून आलेल्या सोनवणे याने गोळी झाडली. ही गोळी निखिलच्या पोटात लागली. गोळीबाराचा आवाज ऐकताच आसपासच्या दुकानदारांनी दुकाने बंद केली. सर्वांनी तेथून पळ काढला. निखिल याने मुख्य रस्त्यावर जाऊन एका दुचाकी चालकाला रुग्णालयात सोडायची विनंती केली. दिनानाथ रुग्णालयात जाऊन तो उपचारांसाठी दाखल झाला. रुग्णालयाने याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस रुग्णालयात धावले.