महापालिकेतील उपलब्ध निधी, मनुष्यबळ पाहता शहराचा विकास जलदगतीने व्हावा, याकरिता पुणे महापालिका प्रशासनाने पी. पी. पी.तत्त्वावर रस्ते बांधणीचा प्रस्ताव मांडला आहे़ या प्रस्तावास महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने यापूर्वीच मान्यता दिली आहे़ त्यामुळे ज्या कोणा जमीनमालक, कंपनी, व्यावसायिक यांना पी़पी़पी़ तत्त्वावर रस्ते बांधणी करावयाची असेल अशा सर्वांचेच स्वागत आहे़ असे यावेळी सभागृहनेते गणेश बिडकर यांनी सांगितले़
शहराचा विकास जलदगतीने व्हावा यासाठी पुणे महापालिकेने यापूर्वीही पीपीपी तत्त्वावर रस्ते विकसित केले आहेत. त्याच धर्तीवर नवीन युनिफाईड विकास नियंत्रण नियमावलीनुसार क्रेडिट बाँडचा वापर करून पीपीपी तत्त्वावर रस्ते विकसित करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले़
--
चौकट २
रस्त्यांची निवड प्रशासनाकडून
शहरातील २३ रस्त्यांपैकी खराडी व मुंढवा येथील चार रस्ते व दोन उड्डाणपूल यांचीच निवड का करण्यात आली, यावर बोलताना हेमंत रासने यांनी, प्रशासनाने या रस्त्यांची पाहाणी करून भूसंपादन, संभाव्य खर्च याचा आराखडा तयार केला होता़ त्यानुसार सदर रस्ते प्रशासनाचेच निवडले असल्याचे सांगितले.