शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

खड्ड्यांना आता अधिकारी जबाबदार?

By admin | Updated: July 31, 2014 02:11 IST

महापालिकेच्या रस्त्यांसाठी कोट्यवधी रुपये खर्च होऊनही मुदतीपूर्वी रस्ते खराब होऊन खड्डे कसे काय पडतात, असा सवाल करीत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला धारेवर धरले

पुणे : महापालिकेच्या रस्त्यांसाठी कोट्यवधी रुपये खर्च होऊनही मुदतीपूर्वी रस्ते खराब होऊन खड्डे कसे काय पडतात, असा सवाल करीत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. खराब रस्ते व खड्ड्यांसाठी केवळ ठेकेदारांना काळ्या यादीत टाकून चालणार नाही. त्याची जबाबदारी संबंधित अधिकारी व अभियंत्यावर टाकून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी आज करण्यात आली. पावसाळ्यात खड्डे वाढत चालले आहेत. त्याचबरोबर डेंगीचा प्रसार होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष व खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त विकास देशमुख यांची आज भेट घेतली. त्या वेळी महापौर चंचला कोद्रे, सभागृह नेते सुभाष जगताप, स्थायी समितीचे अध्यक्ष बापूराव कर्णे, शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष विनायक हनमघर, दत्तात्रय धनकवडे, महेंद्र पठारे आदी उपस्थित होते. त्यानंतर बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती अ‍ॅड. चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. दर वर्षी पावसाळा पूर्व कामांसाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद केली जाते. त्यानंतरही निकृष्ट दर्जाच्या रस्त्यावर खड्डे पडतात. त्यासाठी केवळ ठेकेदाराला जबाबदार धरण्यात येते. मात्र, अधिकाऱ्यांवर काही कारवाई होत नाही. यापुढे रस्त्याची निकृष्ट कामे व खड्ड्यांसाठी अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात यावे. रस्त्याच्या कामांच्या तक्रारीसाठी अधिकाऱ्यांचे फलक लावावेत. तसेच, संबंधित अधिकाऱ्यांची वेतनवाढ रोखण्याची कारवाई करावी, अशी मागणी चव्हाण यांनी केली. तसेच, खड्ड्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी आयुक्त देशमुख यांच्याकडे करण्यात आली.(प्रतिनिधी)