शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

एकतेतून सकारात्मक समाजनिर्मिती

By admin | Updated: March 29, 2017 02:42 IST

चांगला समाज घडवण्यासाठी माणसा-माणसांतील भेद नाहीसा झाला पाहिजे. प्रत्येक माणसाने जाती, पंथ, धर्म, उच्च-नीच हे सर्व भेद

पुणे : चांगला समाज घडवण्यासाठी माणसा-माणसांतील भेद नाहीसा झाला पाहिजे. प्रत्येक माणसाने जाती, पंथ, धर्म, उच्च-नीच हे सर्व भेद संपूर्णपणे बाजूला ठेवले पाहिजेत. परस्परांबद्दल असलेले प्रेम, विश्वास आणि श्रद्धा या भावनेने संपूर्ण समाज उभा करून आपण एकत्र यायला हवे. या भावनांच्या आधारावर माणूस एकात्मता निर्माण करू शकतो. संपूर्ण राष्ट्रामध्ये विविधता असली तरीदेखील एकात्मतेच्या भावनेवर आपण सकारात्मक समाजाची निर्मिती करू शकतो, असे प्रतिपादन श्रुतीसागर आश्रम फुलगावचे स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी केले.हिंदू नववर्ष स्वागत समिती कसबा भागातर्फे कसबा गणपती मंदिर ते शनिवारवाडा शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. शनिवारवाड्याच्या प्रांगणात स्वरुपानंद सरस्वती यांच्या हस्ते ग्रामगुढी उभारून गुढीपाडवा साजरा करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. महापौर मुक्ता टिळक, सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे, रिपब्लिकन पार्टीचे महेंद्र कांबळे, हनुमंत साठे, रा. स्व. संघ कसबा भागाचे संघचालक किशोर शशितल, सहसंघचालक सुहास पवार उपस्थित होते. शोभायात्रेमध्ये प्रभू श्रीराम, छत्रपती शिवाजीमहाराज, राजमाता जिजाऊ, लोकमान्य टिळक, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी महापुरुषांवर साकारलेले चित्ररथ सहभागी झाले होते. ढोल-ताशांचा गजर, वेत्रचर्म आणि लाठी-काठीची प्रात्यक्षिके पाहण्यासोबत शोभायात्रेचे स्वागत करण्याकरिता पुणेकरांनी गर्दी केली. पारंपरिक वेशभूषेत घोड्यावर स्वार होऊन शोभायात्रेत सहभागी झालेल्या तरुणी सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या. कसबा गणपती येथून निघालेल्या शोभायात्रेचा लाल महाल, तांबडी जोगेश्वरी मंदिर, अप्पा बळवंत चौकामार्गे शनिवारवाड्याच्या प्रांगणात समारोप झाला. मोहन शेटे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)एकात्मतेतून विकास स्वामी स्वरुपानंद म्हणाले, ‘एक राष्ट्र, एक समाज, एक कुटुंब आणि व्यक्तिगत जीवन निर्माण करण्याचे एक आदर्श प्रतीक म्हणजे गुढीपाडवा. या प्रतीकाचा आजचा आरंभाचा दिवस आहे. समाजामध्ये एकात्मता निर्माण झाल्यावर खऱ्या अर्थाने उत्कर्ष होतो, त्याच वेळी विकास होतो.’ आम्ही सर्व नगरसेवक मिळून पुण्यामध्ये परिवर्तन घडवून आणणार आहोत. हे परिवर्तन पुणे शहराच्या विकासाचे, संस्कृतीचे आणि संस्कृती जोपासणारे असेल. हे शहर अत्याधुनिक आणि देशाचा चेहरा-मोहरा बदलणारे ठरेल.- मुक्ता टिळक, महापौर.