लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : राज्य शासनातर्फे स्वस्त अन्नधान्य (रेशनिंग) दुकानधारकांना धान्य वितरित करण्यासाठी पीओएस मशिन दिल्या जाणार आहेत. पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील रेशनिंग दुकानदारांना या मशीनच्या वापराबाबतचे प्रशिक्षण अन्नधान्य पुरवठा विभागाच्या वतीने देण्यात येणार आहे. रेशनिंग धान्य दुकानांमध्ये होणारा गैरकारभार रोखण्यासाठी राज्य शासनाने पीओएस मशिनच्या माध्यमातून शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरित करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार पुणे विभागातील सर्व जिल्ह्यात असलेल्या रेशनिंग दुकानधारकांना पीओएस मशीन दिल्या जात आहेत. मात्र, पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात प्रायोगिक तत्त्वावर केवळ दोन पीओएस मशिन देण्यात आलेल्या आहेत. संबधित दुकानधारकांना प्रशिक्षण देण्यात आले असून, आता उर्वरित सर्व रेशनिंग दुकानधारकांना पीओएस मशिनचा वापर कसा करावा, कार्डधारकांचे थंब कसे घ्यावे, यासह इतर आवश्यक असलेल्या तांत्रिक बाबीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात सध्या १ हजार २०० रेशनिंग दुकानधारक आहेत.
पीओएस मशिन चालवण्याचे प्रशिक्षण
By admin | Updated: June 12, 2017 01:32 IST