शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

गरीब कुटुंबांना मिळाला जगण्याचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:10 IST

कोरोनामुळे गतवर्षापासून गरीब कुटुंबांना अनेक समस्यांना तोड द्यावे लागत आहे. बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. एक वेळ अन्नालादेखील काही कुटुंबे ...

कोरोनामुळे गतवर्षापासून गरीब कुटुंबांना अनेक समस्यांना तोड द्यावे लागत आहे. बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. एक वेळ अन्नालादेखील काही कुटुंबे महाग झाल्याचे समोर आले आहे. मध्यंतरीच्या काळात सर्व निर्बंध हटवण्यात आली होती. त्यामुळे कुठेतरी रोजगार उपलब्ध होत होता. विस्कटलेली आर्थिक घडी रुळावर येईल असे वाटत असताना गेल्या दोन महिन्यांपासून पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू करण्यात आले. त्यामुळे अनेकांचे जगणे अवघड झाले आहे. सर्वसामान्य, गरीब, झोपडीत राहणाऱ्या व दररोज रोजंदारीने काम करून आपल्या कुटुंबाची पोटाची खळगी भरणाऱ्या देशातील लाखो कामगारांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याप्रमाणेच शिरूर शहरातही अशी शेकडो कुटुंब राहत आहेत.

शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथील व्यापारी संघाचे उपाध्यक्ष संतोष भंडारी, प्रकाश सुराणा व राजू दुगड यासह आडते दुकानदारांच्या या उन्हाळ्याच्या हंगामात शिरूर, पारनेर, श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांची सुमारे शेकडो टन चिंचेचा व्यवहार होतो. ही वाळलेली चिंचाचे टरफल फोडणे, चिंचोके वेगळे करणे, त्यांचा गाभा वेगळा करणे ही कामे केली जातात. यानंतर चिंचेच्‍या या घटकांचे पॅकिंग करून हे व्यापारी कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, गुजरात राज्यात खाद्य पदार्थांसह वेगवेगळ्या उपयोगासाठी पाठवितात.

ही वाळलेली चिंच या व्यापाऱ्यांनी घेतल्यानंतर सुमारे १५ ते २० किलो चिंच वजन करून घरी आणणे, फोडणे, त्यांचे चिंचोके वेगळे करणे, टरफले वेगळे करणे व पुन्हा वजन करुन देणे यासाठी प्रत्येकी किलोला सुमारे १० ते १५ रुपयांचा भाव या आडते व्यापाऱ्यांकडून दिला जातो. याप्रमाणे शहरातील ही सर्वसामान्य, गरीब, झोपडीत राहणारे, महिला व पुरुष असे शेकडो कुटुंबे चिंच फोडण्याची कामे करत आहे. शहरातील ५०० कुटुंबांना रोजगार उपलब्ध झाला असून त्यांच्या उरनिर्वाहाचा तूर्त प्रश्न मिटला आहे. असे आडते व्यापारी संतोष भंडारी व परेश सुराणा यांनी सांगितले.

२१ शिरूर