शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

पूजाच्या भावाला वनखात्यात नोकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:28 IST

नेहा सराफ लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुण्यात आत्महत्या केलेल्या पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाशी संबंधित अनेक बाबी आता उजेडात ...

नेहा सराफ

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पुण्यात आत्महत्या केलेल्या पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाशी संबंधित अनेक बाबी आता उजेडात येत आहेत. पूजाचा चुलत भाऊ विलास चव्हाण याला यंदाच्या जानेवारी महिन्यातच वनखात्याच्या पुणे कार्यालयात नोकरीला ‘चिकटवण्यात’ आले असल्याचे उघड झाले आहे.

पूजाचा मृत्यू ही हत्या की आत्महत्या याबद्दल अद्याप स्पष्टता आलेली नसताना या प्रकरणाशी संबंधित ऑडिओ क्लिप समाज माध्यमांत व्हायरल झाल्या. त्यानंतर या क्लीपशी संबंधित व्यक्तींचा शोध सुरू असल्याचे सांगितले जाते. त्याचवेळी पूजाचा भाऊ काही आठवड्यांपूर्वीच वनखात्यात नोकरीला लागला असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे पूजाचा मृत्यू झाल्यापासून तो नोकरीवर फिरकला नसल्याचे सांगण्यात येते. वनखात्याचे अधिकारी मात्र या संदर्भात उघडपणे बोलण्यास घाबरत आहेत. दरम्यान वनखात्याची जबाबदारी संजय राठोड यांच्याकडे आहे.

पूजा लहू चव्हाण या २२ वर्षीय युवतीने पुण्यातील महंमदवाडी भागात पहिल्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. या प्रकरणी वानवडी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. मात्र त्यानंतर तिच्याशी संबधित काही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले. या ऑडिओ क्लिपमध्ये विलास चव्हाणचा आवाज असल्याचे सांगितले जाते. पूजा पुण्यात भाऊ विलास चव्हाणसोबत राहत होती. बिल्डिंगमधल्या शेजाऱ्यांना विलासने पूजा त्याची बहीण असल्याचे सांगितले होते.

मृत्यूच्या जेमतेम एक आठवडा आधी पूजा पुण्यात वास्तव्यास आली होती. विलास मात्र जानेवारीपासून पुण्यात राहत होता. विलास पुण्यातील सामाजिक वनीकरण विभागात कामाला असल्याचे समोर आले आहे. तिथे तो शिपाई पदावर कार्यरत असून ८ फेब्रुवारीपासून कामावर गैरहजर असल्याचे वन विभागातील सूत्रांनी सांगितले आहे. जानेवारीपासून तो तिथे नोकरीला असला तरी त्याची थेट भरती करण्यात आलेली नाही. मनुष्यबळ पुरवणाऱ्या कंपनीच्या माध्यमातून विलासला नोकरी देण्यात आली होती.

कार्यालयात त्याची वागणूक अत्यंत सामान्य होती. त्याच्याविषयी बातम्यांमधूनच माहिती समजल्याचे वनविभागातील सूत्रांनी सांगितले. पूजा मृत्यू प्रकरणाशी संबंधित व्यक्तींचे जबाब पुणे पोलिसांनी नोंदवले आहेत. त्यात विलासाचाही समावेश असल्याचे सांगितले जाते. विलासला वनखात्यात कोणी नोकरी दिली, पूजाच्या मृत्यूनंतर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमधला आवाज विलासचाच आहे का, विलास कोणाच्या इशाऱ्यावर काम करत होता, या बाबतचे गूढ कायम आहे.