शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

पूजाच्या भावाला वन विभागात नोकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:29 IST

नेहा सराफ लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुण्यात आत्महत्या केलेल्या पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाशी संबंधित अनेक बाबी आता उजेडात ...

नेहा सराफ

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पुण्यात आत्महत्या केलेल्या पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाशी संबंधित अनेक बाबी आता उजेडात येत आहेत. पूजाचा चुलत भाऊ विलास चव्हाण याला यंदाच्या जानेवारीतच वन विभागाच्या पुणे कार्यालयात नोकरीला ‘चिकटवण्यात’ आले असल्याचे उघड झाले आहे. जानेवारीपासून तो तिथे नोकरीला असला तरी त्याची थेट भरती करण्यात आलेली नाही. मनुष्यबळ पुरवणाऱ्या कंपनीच्या माध्यमातून विलासला नोकरी देण्यात आली होती.

पूजाचा मृत्यू ही हत्या की आत्महत्या याबद्दल अद्याप स्पष्टता आलेली नसताना या प्रकरणाशी संबंधित ऑडिओ क्लिप समाज माध्यमांत व्हायरल झाल्या. त्यानंतर या क्लीपशी संबंधित व्यक्तींचा शोध सुरू असल्याचे सांगितले जाते. त्याचवेळी पूजाचा भाऊ काही आठवड्यांपूर्वीच वन विभागात नोकरीला लागला असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे पूजाचा मृत्यू झाल्यापासून तो नोकरीवर फिरकला नसल्याचे सांगण्यात येते. वन विभागाचे अधिकारी मात्र या संदर्भात उघडपणे बोलण्यास घाबरत आहेत. दरम्यान वन विभागाची जबाबदारी संजय राठोड यांच्याकडे आहे.

पूजा लहू चव्हाण या २२ वर्षीय युवतीने पुण्यातील महंमदवाडी भागात पहिल्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. त्यानंतर तिच्याशी संबधित काही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले. या ऑडिओ क्लिपमध्ये विलास चव्हाणचा आवाज असल्याचे सांगितले जाते. पूजा पुण्यात भाऊ विलास चव्हाणसोबत राहत होती. बिल्डिंगमधल्या शेजाऱ्यांना विलासने पूजा त्याची बहीण असल्याचे सांगितले होते.

मृत्यूच्या जेमतेम एक आठवडा आधी पूजा पुण्यात वास्तव्यास आली होती. विलास मात्र जानेवारीपासून पुण्यात राहत होता. विलास पुण्यातील सामाजिक वनीकरण विभागात कामाला असल्याचे समोर आले आहे. तिथे तो शिपाईपदावर कार्यरत असून ८ फेब्रुवारीपासून कामावर गैरहजर असल्याचे वन विभागातील सूत्रांनी सांगितले आहे.

कार्यालयात त्याची वागणूक अत्यंत सामान्य होती. त्याच्याविषयी बातम्यांमधूनच माहिती समजल्याचे वन विभागातील सूत्रांनी सांगितले. पूजा मृत्यू प्रकरणाशी संबंधित व्यक्तींचे जबाब पुणे पोलिसांनी नोंदवले आहेत. त्यात विलासाचाही समावेश असल्याचे सांगितले जाते. विलासला कोणी नोकरी दिली, पूजाच्या मृत्यूनंतर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमधला आवाज विलासचाच आहे का, विलास कोणाच्या इशाऱ्यावर काम करत होता, या बाबतचे गूढ कायम आहे.