शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

राजकारण्यांची लुडबूड नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2015 01:42 IST

कोणतीही निवडणूक म्हटली की टीका, टिप्पणी, चर्चा होतेच; मात्र, प्राप्त परिस्थितीत हीच सगळ्यात कमी वाईट पद्धत म्हणायला हरकत नाही

पुणे : कोणतीही निवडणूक म्हटली की टीका, टिप्पणी, चर्चा होतेच; मात्र, प्राप्त परिस्थितीत हीच सगळ्यात कमी वाईट पद्धत म्हणायला हरकत नाही. साहित्य संमेलनांमध्ये राजकीय लोकांचा समावेश जरूर असावा; मात्र त्यांची लुडबूड नको, असे मत ज्येष्ठ नेते आणि साहित्यिक उल्हास पवार यांनी नोंदवले.‘संवाद’ या संस्थेतर्फे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे तीन अध्यक्ष आणि स्वागताध्यक्ष यांचा रसिकांशी अनौपचारिक गप्पांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी उल्हास पवार अध्यक्षस्थानावरून बोलत होते. याप्रसंगी सासवडच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. फ. मुुं. शिंदे, स्वागताध्यक्ष विजय कोलते, घुमानमधील संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, स्वागताध्यक्ष भारत देसडला, पिंपरी-चिंचवडच्या संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील, सुनील महाजन, निकिता मोघे, सचिन ईटकर आदी मान्यवर उपस्थित होते. पवार म्हणाले, की प्रत्येक क्षेत्रातला माणूस हा रसिक असतो. त्यामुळे त्याला संमेलनाची अभिरुची असणे साहजिक आहे. मात्र, संमेलनामध्ये अध्यक्षाला मानाचे स्थान मिळालेच पाहिजे. आजकाल साहित्य संमेलनाचा होत असलेला सोहळा, उत्सव साहजिक आहे. ते अवाजवी नाही; कारण हा आनंदाचा मेळावा आहे.श्रीपाल सबनीस म्हणाले, की संमेलनाध्यक्ष निवडणुकीबाबत पराभूतांपेक्षा त्यांच्या समर्थकांच्याच तक्रारी जास्त असतात. तक्रारदारांनी एकत्र येऊन विधायक नियमावली महामंडळाकडे सुपूर्त करावी. यंदा अध्यक्षीय भाषणाशिवाय त्याची एक विशेष मुलाखत घेण्याची सूचना महामंडळाकडे सुचवली आहे. सदानंद मोरे म्हणाले, की साहित्यिकच एकमेकांना मान देत नाहीत. व्यक्तीला पाठिंबा दिला तर निवडणुकीची गरजच भासणार नाही. त्यामुळे त्याचे मनोगत आशयघन असावे. त्याचे भाषण हा संमेलनानंतरही रसिकांच्या जिज्ञासेचा, कुतूहलाचा विषय असतो. त्यामुळे संमेलनात भूमिका मांडायला त्याला पुरेसा वेळ मिळालाच पाहिजे.सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले. निकिता मोघे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)निवडणूक प्रक्रिया खेळीमेळीत पार पडायला हवी. कारण, आनंद हे साहित्याचे अधिष्ठान असते. अध्यक्षाला संमेलनानंतरही रसिकांचे प्रेम मिळते आणि तोच त्याचा सन्मान असतो. राजकीय व्यक्तींनी रस दाखवला नाही तर संमेलन होणार नाही, असे मला वाटते. कारण, तोही साहित्यप्रेमीच असतो. साहित्य सामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा स्वागताध्यक्षांचा प्रयत्न असतो. त्यामुळे संमेलनांमध्ये साहित्यिक अस्पृश्यता नसावी. - फ. मुं. शिंदे, कवी