शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

मॉब पोलसाठी राजकीय पक्ष उदासीन

By admin | Updated: September 11, 2014 04:39 IST

लोकसभा निवडणुकीत मतदार यादीतून हजारो नावे गायब झाल्यानंतर गोंधळ घालणारे राजकीय पक्ष अजूनही शहाणे झाले नसून विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासनाकडून पूर्वतयारी सुरू झाली

पुणे : लोकसभा निवडणुकीत मतदार यादीतून हजारो नावे गायब झाल्यानंतर गोंधळ घालणारे राजकीय पक्ष अजूनही शहाणे झाले नसून विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासनाकडून पूर्वतयारी सुरू झाली आहे़ ही प्रक्रिया जास्तीतजास्त निर्दोष व्हावी, यासाठी प्रशासनाने वेळोवेळी सर्व राजकीय पक्षांना बोलवले होते़ पण, अजूनही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले़ शिवाजीनगर गोदामात सध्या विधानसभा निवडणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनची तपासणी सुरू आहे़ पुणे जिल्ह्यासाठी जवळपास १० हजार मशीन लागणार आहेत़ त्यासाठी उत्तर प्रदेशातून मशीन आणण्यात आली आहे़ त्यातील ८ हजार ५०० कंट्रोल मशीन आणि १२ हजार २०० बॅलेट युनिटची तपासणी इलेक्ट्रॉनिक कॉपोरेशन आॅफ इंडियाचे २१ अभियंता करीत आहेत़ सध्या या मशीनवरील जुना डाटा काढून टाकून ती सील करण्याचे काम गेल्या एक महिन्यापासून सुरू आहे़ पुढील काही दिवसांत बिहारमधून ७ हजार मशीन आणण्यात येणार आहेत़निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार त्यातील ५ टक्के मशीनमध्ये प्रत्येकी १ हजार मते टाकून ती व्यवस्थित काम करीत आहे, हे तपासण्यास सांगण्यात आले आहे़ त्यासाठी राजकीय पक्षांची मदत घेण्यास सांगितले आहे़ यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व राजकीय पक्षांना आतापर्यंत तीन वेळा पत्रे पाठवून ही मशीन तपासण्यासाठी कार्यकर्त्यांना पाठविण्याचे कळविले आहे़ या मॉब पोलसाठी आज सकाळी ११ वाजता शिवाजीनगर येथील शासकीय गोदामात उपस्थित राहण्यास सांगितले होते़ काँग्रेसचे शहराध्यक्ष अ‍ॅड़ अभय छाजेड यांनी तसे सर्व ब्लॉक अध्यक्षांना कळविले़ पण त्यापैकी चौघेच सकाळी उपस्थित होते़ त्यांनी दिवसभर थांबून मॉब पोल करून तपासणी केली़ अन्य पक्षांनी या पत्राची दखलही घेतली नाही़ लोकसभा निवडणुकीत हजारो मतदारांची नावे मतदारयादीतून गायब झाल्याचा अनुभव आला होता़ अनेकांनी व्होटिंग मशीनविषयी शंका उपस्थित केल्या होत्या़ लोकसभा निवडणुकीतील अनुभव लक्षात घेऊन निवडणूक प्रक्रिया अधिक निर्दोष व्हावी, मतदार यादीतील चुका, त्याविषयीची माहिती देण्यासाठी यापूर्वीही विधानसभानिहाय निवडणूक अधिकाऱ्यांनी वेळोवेळी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना बोलविले होते़ पण, अपवाद वगळता कोणीही प्रतिसाद दिला नसल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)