शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेसाठी राजकीय पक्षांचे आडाखे

By admin | Updated: May 29, 2016 03:49 IST

महापालिकेची सत्ता मिळविण्यासाठी प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांनी २०१७ची निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून आडाखे व मोर्चेबांधणी सुरू केली आहे. संभाव्य चार सदस्यीय प्रभाग रचनेनुसार

पिंपरी : महापालिकेची सत्ता मिळविण्यासाठी प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांनी २०१७ची निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून आडाखे व मोर्चेबांधणी सुरू केली आहे. संभाव्य चार सदस्यीय प्रभाग रचनेनुसार पक्षसंघटन व कार्यकर्त्यांची मोर्चेबांधणी सुरू केली आहे.आगामी महापालिका निवडणुकीत चार सदस्यीय प्रभाग पध्दतीची अधिसूचना शासनाने काढली आहे. त्यानुसार आपल्या राजकीय पक्षासाठी महापालिकेतील सत्तेचे समीकरण जुळवणे सुरू आहे. त्यासाठी प्रत्येक पक्ष आपली राजनिती व धोरणे आखत आहे. महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादीने विकासकामांच्या उद्घाटनाचा धडाका आणि भूमिपूजन उरकण्याचा सपाटा लावला आहे. तर विरोधी पक्षांकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. नागरी प्रश्नांवर आंदोलन, मोर्चे काढून जनतेच्या हिताचा कळवळा दाखविण्याचे प्रयत्न होत आहेत. देशात आणि राज्यात सत्ता काबीज केलेल्या भारतीय जनता पक्षाने महापालिका स्तरावरसुद्धा आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा चंग बांधला आहे. भाजपाने पक्षात प्रवेश करणाऱ्यांसाठी महाद्वार खुले केले आहे. अन्य पक्षांतून अनेक जण भाजपात प्रवेश करू लागले आहेत. पक्षात प्रवेश केलेल्यांपैकी काहींना नव्या कार्यकारिणीत महत्त्वाची पदे देण्यात आल्याने जुन्या कार्यकर्त्यांमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू झाली आहे. राज्यात युतीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली जात आहे. शासनाच्या योजनांचा गवगवा करून मतदारांवर प्रभाव टाकण्याचे काम भाजपातर्फे सुरू आहे. राज्यात शिवसेनेची भाजपाबरोबर युती असताना स्थानिक पातळीवर मात्र त्यांच्यात आरोप-प्रत्यारोप होत आहेत. महापालिका स्तरावर युती होण्याची शक्यता नाही, असे गृहीत धरून स्वबळावर निवडणूक लढण्याची भाषा शिवसेनेचे पदाधिकारी बोलत आहेत. भाजपाशी सख्य न ठेवता संधी मिळेल, तेथे शिवसेनेचे कार्यकर्ते अस्तित्व दाखवून देऊ लागले आहेत. नागरी प्रश्नांवर आंदोलन, मोर्चे यांतून त्यांनी वातावरण ढवळून काढण्यावर भर दिला आहे. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आवाज उठवताना मित्रपक्ष भाजपावरही टीका केली जात आहे. काँग्रेसमधील स्थानिक पदाधिकाऱ्यांमधील गटबाजी मिटविण्यासाठी वरिष्ठ स्तरावरून दखल घेतली. मात्र, अद्याप मनोमीलन झाल्याचे प्रत्यक्षात दिसत नाही. मात्र, शहराध्यक्षांनी युवा संघटनावर जोर दिला आहे. चार वॉर्डांचा एक प्रभाग होणार आहे. सुमारे ५० हजार मतदार संख्येचा प्रभाग असल्याने मिनी विधानसभा अशी ही निवडणूक होणार आहे. त्यामुळे मनसे, एमआयएम, आरपीआय, बसपा या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आतापासूनच उमेदवाराचा शोध घेण्याची मोहीमहाती घेतली आहे. आंदोलन, सभा आणि कार्यक्रम या अस्तित्व दाखविले जात आहे. (प्रतिनिधी)मिनी विधानसभा : १ प्रभाग ४० हजार लोकसंख्येचासध्या पिंपरी-चिंचवड महापालिकेत २०११च्या जनगणनेनुसार ६४ दोन सदस्यीय प्रभाग व १२८ नगरसेवक आहेत. या काळात कोणताही हद्दवाढ न झाल्यास नव्या चार सदस्यीय प्रभागानुसार नगरसेवकांची संख्या कायम राहून प्रभागांची संख्या ३२ पर्यंत खाली येणार आहे. शिवाय, एका चार सदस्यीय प्रभागात खुला पुरुष, महिला, मागासवर्गीय यांना संधी मिळणार आहे.