शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

निनावी तक्रारींमुळे पोलीस हैराण

By admin | Updated: November 18, 2015 03:54 IST

निनावी आणि खोट्या तक्रारअर्जांमुळे पोलीस कर्मचारी आणि अधिकारी पुरते हैराण झाले असून, खात्यातील असंतुष्टांकडून होणाऱ्या या उपद्व्यापांमुळे कर्तबगार पोलिसांचीही

पुणे : निनावी आणि खोट्या तक्रारअर्जांमुळे पोलीस कर्मचारी आणि अधिकारी पुरते हैराण झाले असून, खात्यातील असंतुष्टांकडून होणाऱ्या या उपद्व्यापांमुळे कर्तबगार पोलिसांचीही कामगिरी खालावत चालली आहे. निनावी आणि खोट्या तक्रारी, खोट्या सहीने केलेल्या तक्रारी आल्यास त्यावर कार्यवाही न करता असे अर्ज दफ्तरी दाखल करण्यात यावेत, असे शासनाचे आदेश असतानाही वरिष्ठ अधिकारी मात्र छळवणुकीसाठी या अर्जांचा वापर करीत असल्याचे चित्र आहे.पोलीस दलामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांच्या ‘नेटवर्क’ला मोठे महत्त्व आहे. हाताच्या बोटावर मोजण्याइतपत अधिकारी सोडले तर अन्य शहर व जिल्ह्यांमधून बदलून आलेल्या अधिकाऱ्यांचे स्वत:चे नेटवर्क तयार झालेले नसते. खबऱ्यांचे जाळे अधिक घट्ट असल्यास गुन्हे उघडकीस आणण्यासाठी त्याचा मोठा उपयोग होतो. पोलिसांचे कान आणि डोळे म्हणजे त्यांचे खबरे. खबऱ्यांशी संपर्क ठेवून माहिती काढण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. अनेकदा कर्मचाऱ्यांना त्यासाठी वरिष्ठांची व सहकारी कर्मचाऱ्यांची नाराजी सोसावी लागते. गुणवत्तेच्या आधारे कामामध्ये आघाडी घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना मात्र अलीकडच्या काळात निनावी अर्जांद्वारे त्रास देण्याचे उपद्व्याप सुरू झाले आहेत. त्यामुळे काम करणारे कर्मचारीही शांत झाले आहेत. ज्या तक्रारींमध्ये तक्रारदाराचे नाव व पत्ता नमूद केलेला नाही, अशा निनावी तक्रारींमध्ये कोणत्याही स्वरूपाची माहिती अंतर्भूत असली तरी त्यावर कार्यवाही करण्यात येऊ नये, अशा तक्रारी दफ्तरी दाखल करून घ्याव्यात. असंबद्ध आरोप असणाऱ्या तक्रारींची तपासणी करण्यात येऊ नये. ज्या तक्रारींमध्ये पडताळणी करता येऊ शकेल असे आरोप केलेले आहेत, अशा तक्रारींच्या संबंधात प्रशासकीय विभाग अथवा मंत्रालयाने दखल घ्यावी. ही तक्रार सक्षम प्राधिकाऱ्याच्या मान्यतेने तक्रारदाराकडे पाठवून ती त्याने स्वत: केली आहे काय, याबाबत खात्री करून घ्यावी. तक्रारदाराकडून १५ दिवसांत प्रतिसाद न मिळाल्यास स्मरणपत्र पाठवून आणखी १५ दिवस प्रतीक्षा केल्यानंतरही जर प्रतिसाद न मिळाल्यास ही तक्रार खोट्या नावाने केल्याचे नमूद करावे, असे आदेशात म्हटले आहे. अशा सर्वच अर्जांबाबत चौकशी करण्याची आवश्यकता नसून, पडताळणी समर्थनास उपयुक्त अशा प्रसंग अथवा चौकशीयोग्य मुद्यांचा उल्लेख असेल आणि हे मुद्दे सार्वजनिकदृष्ट्या पुरेसे महत्त्वाचे असतील तरच चौकशी करण्यात यावी, असेही नमूद करण्यात आलेले आहे. पदोन्नतीच्या काळात असे प्रकार : खात्यांतर्गत स्पर्धेमुळेही प्रकारप्रशासनातील अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना त्रास देण्याच्या हेतूने निनावी किंवा खोट्या नावाने तक्रारी नाराज झालेल्या व्यक्तींकडून केल्या जातात. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळण्याच्या दरम्यान निनावी व खोट्या नावाने तक्रारी केल्या जातात. परिणामी त्यांना पदोन्नती मिळणे अडचणीचे ठरते. यासोबतच त्यांच्या नीतिमूल्यांचे खच्चीकरण केले जाते. असे निनावी अर्ज करणाऱ्याने खरेपणाबद्दलची सही केली पाहिजे. सही येत नसल्यास त्याने अंगठ्याचा ठसा उमटवला पाहिजे, असेही सामान्य प्रशासन विभागाच्या आदेशामध्ये नमूद करण्यात आलेले आहे. परंतु शासनाचे स्पष्ट आदेश असतानाही खात्यांतर्गत स्पर्धेमधून निनावी व खोटे अर्ज करण्याचे प्रमाण लक्षणीय आहे.