शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
4
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
5
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
6
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
7
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
8
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
9
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
10
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
11
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
12
भाजपा नगरसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
13
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
14
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
15
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
16
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
17
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
18
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
19
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
20
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना

घरफोडी करणार्‍यांना पोलीस कोठडी

By admin | Updated: May 18, 2014 23:49 IST

कर्वेनगरमध्ये घरफोडी करून सुमारे १२ लाख रुपयांचे सोने, हिरे, चांदीचे दागिने, डॉलर चोरणार्‍या २ आरोपींना कोथरूड पोलिसांनी अटक केली

पुणे : कर्वेनगरमध्ये घरफोडी करून सुमारे १२ लाख रुपयांचे सोने, हिरे, चांदीचे दागिने, डॉलर चोरणार्‍या २ आरोपींना कोथरूड पोलिसांनी अटक केली. त्यांना आज न्यायालयात हजर केले असताना न्यायदंडाधिकार्‍यांनी आरोपींना २२ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. आरोपी हे घरफोडी करणारे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. राजबीरसिंग बाबुलालसिंग चौहान (वय २७, रा. फारूखनगर, जि. गुडगाव, रा. हरियाणा) आणि धर्मेंद्र छोटेलाल शर्मा (वय २८, रा. कसबा क्लान, ता. जलालाबाद, जि. शहाजपूर, रा. उत्तर प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पौर्णिमा जयंत पडबिद्री (वय ६३, रा. कर्वेनगर) यांनी या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. हा गुन्हा ३ एप्रिलला घडला होता. पडबिद्री घरात नसताना दुपारी दरवाज्याचे लोखंडी ग्रील कापून, लॅचलॉक तोडून आरोपींनी घरात प्रवेश केला आणि लोखंडी कपाटातील ११ लाख ७८ हजार ६५० रुपयांचे हिर्‍यांचे, सोन्याचे, चांदीचे दागिने आणि डॉलर चोरून नेले होते. आरोपींचे आणखी कोणी साथीदार आहेत का, चोरलेला ऐवज हस्तगत करायचा असल्याने आणि यासाठी त्यांनी कोणत्या हत्यारांचा वापर केला, याचा तपास करायचा असल्याने त्यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली होती. ती न्यायालयाने मान्य केली. (प्रतिनिधी)