शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस बंदोबस्तात उघडले आळेफाटा शाळेचे टाळे

By admin | Updated: June 15, 2016 04:55 IST

शिवछत्रपती नगर विकास संस्थेने आळेफाटा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी भाडेतत्त्वावर दिलेल्या वर्गखोल्यांचे सुमारे साडेसहा लाख रुपयांहून अधिक भाडे थकले होते.

आळेफाटा : शिवछत्रपती नगर विकास संस्थेने आळेफाटा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी भाडेतत्त्वावर दिलेल्या वर्गखोल्यांचे सुमारे साडेसहा लाख रुपयांहून अधिक भाडे थकले होते. भाडे न मिळाल्याने संस्थेने शाळेच्या वर्गखोल्यांना टाळे ठोकले होते. या वर्गखोल्या पुन्हा सुरू करण्याची विनंती करण्यात आली होती. मात्र, तरीसुद्धा शाळा बंद ठेवण्यात आली. उद्या १५ जून रोजी शाळा सुरू होणार असल्याने पोलीस बंदोेबस्तात आणि गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे टाळे उघडण्यात आले.आळेफाटा येथील शिवछत्रपती नगर विकास संस्थेने गेली १६ हून अधिक वर्षे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी भाडेतत्त्वावर वर्गखोल्या उपलब्ध करून दिल्या आहेत. पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग येथे भरतात. एप्रिल २०१२ ते मार्च २०१५ मधील भाड्यापोटी संस्थेला साडेतीन लाख रुपये शिक्षण विभागाने दिले. मात्र, त्यातील थकीत साडेतीन लाख व या शैक्षणिक वर्षाचे भाडे, असे साडेसहा लाखांहून अधिक भाडे अनुदान पाठपुरावा करूनही न मिळाल्याने अखेर संस्थेने वर्गखोल्यांना टाळे ठोकले. शाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर आज गटविकास अधिकारी नम्रता जगताप, गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे, सभापती संगीता वाघ, संस्थेचे अध्यक्ष शिवाजी शिंदे, सचिव भीमाजी गडगे व संचालक यांची बैठक झाली. मात्र, यातून मार्ग न निघाल्याने अखेर विस्तार अधिकाऱ्यांनी आळेफाटा पोलीस ठाण्यात वर्गखोल्या उघडण्याबाबत तक्रार दाखल केली. यानंतर पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्तात हे टाळे आज सायंकाळी खोलण्यात आले. शिक्षणाला आमचा विरोध नसून पाठपुरावा करूनही भाडे वेळेवर मिळत नसल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.