शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

हडपसर पोलीस करताहेत पहारा देण्याचे काम

By admin | Updated: May 14, 2016 00:27 IST

शेवाळवाडी (ता. हवेली) येथे पुणे-सोलापूर महामार्गावर महसूल विभागाने अनधिकृतपणे वाळू वाहतूक करणाऱ्या चौदा ट्रकवर कारवाई करून दोन दिवसांचा कालावधी झाला

लोणी काळभोर : शेवाळवाडी (ता. हवेली) येथे पुणे-सोलापूर महामार्गावर महसूल विभागाने अनधिकृतपणे वाळू वाहतूक करणाऱ्या चौदा ट्रकवर कारवाई करून दोन दिवसांचा कालावधी झाला, तरी आजअखेर दंडाची रक्कम भरण्यासाठी तहसील कार्यालयात कोणीही फिरकले नसल्याने या वाहनांना पहारा देण्याचे काम हडपसर पोलिसांना करावे लागत आहे. कारवाईत पकडण्यात आलेली सहा वाहने सिद्धेश्वर पेट्रोलपंपाच्या आवारामध्ये उभी असून, अन्य आठ वाहने रस्त्याच्या कडेला सोडून वाहनचालक फरार झाल्याने संबंधित वाहनांच्या चाकातील हवा सोडून दिली आहे. त्यामुळे वाहनचालक त्वरित रितसर महसूल कायद्यानुसार दंड भरतील, अशी अपेक्षा होती. मात्र, कोणताही वाहनचालक अथवा मालक हवेली तहसीलदार कार्यालयात फिरकलेच नाही.जिल्हाधिकारी कार्यालयातील आदेशान्वये हवेली तालुक्याचे तहसीलदार दशरथ काळे, निवासी नायब तहसीलदार सुनील शेळके, थेऊरचे मंडल अधिकारी हरिदास चाटे, लोणी काळभोर येथील तलाठी विष्णू चिकने, हडपसरचे तलाठी शिवाजी देशमुख, लोहगावचे तलाठी हिंदूराव पोळ, वारजे माळवाडी येथील तलाठी विकास फुके,महंमदवाडीचे तलाठी दिलीप पलांडे, मांजरी बुद्रुक येथील तलाठी मिलिंद सेठी, खराडी येथील तलाठी गणेश सुतार, खेड शिवापूर येथील तलाठी प्रकाश महाडिक, कोतवाल नामदेव शिंदे, हवेली तहसील कार्यालयातील कारकून सचिन पवार, रोहन देवरे इत्यादीनी महसूलच्या पथकात भाग घेऊन चौदा वाहनांवर धडक कारवाई केली आहे.महसूल विभागाच्या कारवाईनंतर पुन्हा या परिसरात अनधिकृत वाळूची वाहने ये-जा करू लागली आहेत. रस्त्याच्या कडेला पहाटे सकाळी लवकर व रात्री उशिरा याठिकाणी वाळू वाहतूकदारांनी आपला थांबा याठिकाणी बनवला आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाळूला खरेदीदार मिळत असल्याने वाळू वाहनांची सतत येथे वर्दळ असते. ( वार्ताहर )