शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

खिशात कॅश पण गाड्या ‘आऊट आॅफ स्टॉक’

By admin | Updated: March 31, 2017 23:54 IST

खिशात बक्कळ पैसा घेऊन ग्राहक खरेदीसाठी आलेले परंतु शोरुममध्ये मात्र गाड्याच आऊट आॅफ स्टॉक असल्याने

बारामती : खिशात बक्कळ पैसा घेऊन ग्राहक खरेदीसाठी आलेले परंतु शोरुममध्ये मात्र गाड्याच आऊट आॅफ स्टॉक असल्याने बहुसंख्य नागरिकांची गाड्याखरेदीबाबत निराशा झाली. आज सकाळपासून विविध दुचाकी-चारचाकी वाहनांच्या शोरुमबाहेर ग्राहकांची झुंबड उडाली होती. कॅश असूनही डिस्काऊंटमधील गाड्या खरेदीचे स्वप्न काही पूर्ण झाले नाही. सर्वोच्च न्यायालयाने बीएस-३ इंजिन असलेल्या सर्व वाहनांवर बंदी घातली आहे. आर्थिक वर्ष संपण्यासाठी दोन दिवस शिल्लक असताना घातलेली बंदी ही नामी संधी समजून दुचाकी गाड्यांच्या उत्पादक कंपन्यांनी थेट १५ ते १८ हजार पर्यंत सूट जाहीर केलेली होती. गाड्या खरेदीसाठी ग्राहकांची दोन दिवस धूम उडाली. गाड्यांची नोंदणी करण्याची ३१ मार्च ही शेवटची तारीख असल्याने ग्राहकांची दुचाकीच्या शोरूमवर बुकिंगसाठी झुंबड उडाली होती. अनेक शोरूम्सनी रात्री १२ पर्यंत शोरूम सुरू ठेवली होती. गाड्यांची संख्या कमी असल्याने अनेक ग्राहकांना रिकाम्या हाताने परतावे लागले. विशेष म्हणजे १ एप्रिलपासून या गाड्यांच्या विक्री व नोंदणीवर बंदी घातली आहे. त्यामुळे उपलब्ध असलेल्या गाड्यांवर थेट कंपन्यांनीच ‘डिस्काउंट आॅफर’ दिली. विशेष मागणी होंडा कंपनीच्या दुचाकी स्कूटर, मोटार सायकलला होती. बारामतीच्या सराफ होंडा वितरकाकडे असलेल्या स्कूटर गाड्या हातोहात खपल्या, असे कौशल शहा सराफ यांनी सांगितले. मोटार सायकलच्या खरेदीला देखील ग्राहकांची पसंती होती. हिरोच्या गाड्यांना देखील ग्राहकांची मागणी होती. या कंपन्यांचे बीएस-३ इंजिन असलेल्या सीबीझेड, स्प्लेंडर प्रो या गाड्या उपलब्ध आहेत. या गाड्यांवर साधारणत: साडेबारा हजार रुपये सूट देण्यात आली आहे, अशी माहिती संदीप पवार यांनी दिली. महालक्ष्मी हिरो, कमल बजाज, जे.जे. टीव्हीएस, नवनाथ अ‍ॅटो, सराफ होंडा, धनेश सुझुकी, तुळजा मोटर्स, जय बुलेट आदी शोरूममध्ये आॅफरमुळे उशिरापर्यंत गर्दी होती.