शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पीएमपीस हवी २ कोटींची ‘ओवाळणी’

By admin | Updated: August 18, 2016 06:32 IST

रक्षाबंधनानिमित्त पीएमपीने प्रवास करणाऱ्यांना कोणत्याही गैरसोयीचा सामना करावा लागू नये यासाठी प्रशासनाकडून १०३ जादा गाड्यांची तयारी करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांत

पुणे : रक्षाबंधनानिमित्त पीएमपीने प्रवास करणाऱ्यांना कोणत्याही गैरसोयीचा सामना करावा लागू नये यासाठी प्रशासनाकडून १०३ जादा गाड्यांची तयारी करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांत रक्षाबंधनाच्या दिवशी पीएमपीला एकाच दिवशी सर्वाधिक उत्पन्न मिळते. ही बाब लक्षात घेऊन यंदा पीएमपीकडून शहरातील सर्व मार्गांवर तब्बल १७४० गाड्या सोडण्यात येणार आहेत. तसेच रक्षाबंधनाच्या दिवशी प्रशासनाकडून २ कोटी १० लाखांपेक्षा अधिक रुपये उत्पन्नाचे लक्ष्य ठेवण्यात आले असून, त्याबाबतच्या सूचना तसेच नियोजनाची माहिती सर्व डेपोप्रमुखांना देण्यात आली आहे. पीएमपीकडून सध्या शहरातील सर्व मार्गांवर १६३७ बसेस सोडण्यात येतात. रक्षाबंधनाला वाढणारे उत्पन्न लक्षात घेऊन मागील वर्षी १५० जादा बस सोडण्यात आल्या होत्या. त्या वेळी सरासरी १५०० बस मार्गावर असायच्या. त्यातून पीएमपीला एक कोटी ८२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. आज शहरातील सर्व महत्त्वाच्या ठिकाणी देखरेख ठेवण्यात येणार असून, त्या ठिकाणी अधिकारीही नियुक्त करण्यात येणार आहेत. बस बंद पडू नयेत, म्हणून त्यांची योग्य प्रकारे देखभाल-दुरुस्ती करण्यात येणार आहे, अशी माहिती वाहतूक व्यवस्थापक अनंत वाघमारे यांनी दिली. तसेच जास्तीत जास्त बसेस मार्गावर असाव्यात, म्हणून वाहक-चालक यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. पीएमपीचे सुमारे २०० अधिकारी व कर्मचारी नियोजनाकरिता मार्गावर थांबणार असल्याचे वाघमारे यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)सवलतीच्या पासचाही फायदा पीएमपीकडून या वर्षी पंधरा दिवस देण्यात येणाऱ्या सवलतीच्या पासची योजना रक्षाबंधनाच्या दिवशीही लागू राहणार आहे. त्यामुळे एका दिवसाचा पास ७० ऐवजी ५० रुपयांना मिळणार आहे. त्यामुळे या दिवशी या पासची मागणी वाढण्याची शक्यताही असल्याचे वामघारे म्हणाले. त्या अनुषंगाने सर्व तयारी करण्यात आली असून, वाहकांकडे जास्तीत जास्त पास उपलब्ध करून देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.