शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

चालढकलीमुळे पीएमपीला ब्रेक

By admin | Updated: December 16, 2014 04:17 IST

संचलनातील तूट व पासेसच्या थकीत रकमेसाठी पुणे महानगर परिवहन मंडळाने (पीएमपी) सोमवारपर्यंत ४६ वेळा पत्रव्यवहार केला आहे

राजानंद मोरे, पुणेसंचलनातील तूट व पासेसच्या थकीत रकमेसाठी पुणे महानगर परिवहन मंडळाने (पीएमपी) सोमवारपर्यंत ४६ वेळा पत्रव्यवहार केला आहे. मात्र, अद्याप ही रक्कम मिळाली नाही. तर पीएमपीने पाठविलेल्या पत्रांना दोन्ही पालिकांनी केराची टोपली दाखविली आहे. आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी ‘पीएमपी’ला दोन्ही पालिकांकडे हक्काचा पैसा मागण्यासाठीही वारंवार हात पसरावे लागत आहेत. मात्र ते देण्याची दोन्ही पालिका प्रशासनामध्ये इच्छाशक्ती नसल्याचे स्पष्ट होते. नियोजनशून्य कारभारामुळे ‘पीएमपी’ तोट्यात चालली असल्याची ओरड पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकांतील पदाधिकारी, आमदार, नगरसेवक करतात. बस दुरुस्तीसाठीही पीएमपीकडे पैसा नसल्याने दररोज शेकडो बस जागेवर उभ्या असतात. मात्र ११ लाखांपेक्षा जास्त प्रवाशांना सेवा देणाऱ्या ‘पीएमपी’ला मदतीचा हात तसेच हक्काचे पैसे देण्यासही दोन्ही महापालिकांकडून टाळाटाळ केली जात आहे. लेखापरीक्षण अहवालानुसार २०२३-१४ या वर्षातील पीएमपीची एकूण वार्षिक संचलन तूट १३२.५२ कोटी एवढी आहे. ही तूट दोन्ही महापालिकांनी त्यांच्या हिश्श्यानुसार पीएमपीला देण्याचे आदेश राज्य सरकारने फेबु्रवारी २०१४ मध्ये दिले आहेत. यामध्ये पुणे महापालिकेचा हिस्सा ७९.५१ कोटी होता. त्यापैकी ४७ कोटी पीएमपीला देण्यात आले आहेत. तर पिंपरी चिंचवड पालिकेने ५३ कोटींपैकी ४५ कोटी रुपये दिले आहेत. तसेच विविध सवलतीच्या पासेसच्या अनुदानापोटी पुणे पालिकेकडे ३३.४० कोटी तर पिंपरी चिंचवड पालिकेकडे २६.४० कोटी थकीत आहेत, असे एकूण १००.३२ कोटी रुपये दोन्ही पालिकांकडून पीएमपीला मिळणे बाकी आहे.पासेसची रक्कम मिळविण्यासाठी ‘पीएमपी’ प्रशासनाकडून दोन्ही महापालिकांकडे दीड वर्षापासून पाठपुरावा केला जात आहे. त्यामध्ये पुणे पालिकेला दहा वेळा तर पिंपरी चिंचवड पालिकेला ११ वेळा पत्रे पाठविण्यात आली आहेत. तर संचनल तुटीच्या मागणीसाठी अनुक्रमे १२ व ११ पत्रे पाठवून स्मरण करून देण्यात आले आहे. सोमवारीही दोन्ही पालिकांना पत्रे पाठविण्यात आली आहेत. पत्रांव्यतिरिक्त प्रत्यक्ष भेटी, स्थायी समिती व मुख्य सभांच्या माध्यमातून ही मागणी करण्यात आली आहे. सातत्याने पाठपुरावा करूनही दोन्ही पालिकांनी सुमारे १०० कोटी पीएमपीला देण्यास हात आखडता घेतला आहे. काही हजार रुपयांसाठीही शेकडो बस दुरुस्त होऊ शकत नाही. परिणामी मार्गावर बस कमी येऊन प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. मात्र दोन्ही पालिकांकडून त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जात आहे.