शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पीएमपीला ६० लाखांचे उत्पन्न

By admin | Updated: September 2, 2016 05:43 IST

बीआरटी प्रकल्पाच्या वर्धापन दिनानिमित्त पीएमपील प्रशासनाने १४ आॅगस्ट २०१६ ते ३१ आॅगस्टदरम्यान ५० रुपयांमध्ये एकदिवसीय सवलत पास देण्याचा उपक्रम राबविला.

पिंपरी : बीआरटी प्रकल्पाच्या वर्धापन दिनानिमित्त पीएमपील प्रशासनाने १४ आॅगस्ट २०१६ ते ३१ आॅगस्टदरम्यान ५० रुपयांमध्ये एकदिवसीय सवलत पास देण्याचा उपक्रम राबविला. प्रवाशांचा प्रतिसाद पाहता या उपक्रमाला २८ फेबु्रवारीपर्यंत मुदतवाढही देण्यात आली आहे. पहिल्या दिवसापासून या सवलतीच्या पासला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, पंधरा दिवसांत पिंपरी-चिंचवड शहरातून ६० लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. सुमारे एक लाख सतरा हजार पासची विक्री झाली आहे. सर्वाधिक उत्पन्न निगडीतून मिळाले आहे. यामध्ये पिंपरी विभागातून पंधरा दिवसांत ३५ हजार ७०६ प्रवाशांनी सवलतीच्या पासचा लाभ घेतला. यातून पीएमपीएला १७ लाख ८५ हजार रुपये इतके उत्पन्न मिळाले आहे. या पंधरा दिवसांमध्ये पतेती व रक्षाबंधन या दोन सणांच्या दिवशी प्रवाशांनी सवलतीच्या पासचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतल्यामुळे सुमारे तीन लाखांचे उत्पन्न मिळाले होते. दरम्यान, पिंपरी-कात्रज, संभाजीनगर-पुणे, पिंपरी औंधमार्गे पुणे स्टेशन, पुणे मनपा, मार्केट यार्ड या मार्गांवरील बसेसला उत्स्फूर्त प्रतिसाद असल्याने या मार्गांवरच सवलतीच्या पासची विक्री मोठ्या प्रमाणावर होत असल्याची माहिती पिंपरीचे पीएमपी डेपोचे व्यवस्थापक शांताराम वाघेरे यांनी दिली. तर निगडी विभागातून ४१ हजार ७५१ प्रवाशांनी सवलतीच्या पासचा लाभ घेतल्याने यातून पीएमपीला २० लाख ८७ हजार ५५० रुपये इतके उत्पन्न मिळाले आहे. दरम्यान, पतेती आणि रक्षाबंधन या दोन सणांना निगडी विभागातूनदेखील सवलतीच्या पासला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. या दोन पीएमपीला दिवसात पावणेदोन लाखांचे उत्पन्न मिळाले होते.(प्रतिनिधी)निगडी ते पुणे रेल्वे स्टेशन, निगडी ते हडपसर, निगडी ते कात्रज, निगडी ते मनपा या मार्गावरील प्रवाशांनी सवलतीच्या पासचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला असल्याची माहिती व्यवस्थापक राजेश रूपानवार यांनी दिली. तसेच भोसरी विभागातून ४० हजार २२१ प्रवाशांनी घेतलेल्या सवलतीच्या पास योजनेतून पीएमपीला २० लाख ११ हजार ५० रुपये एवढे उत्पन्न मिळाले आहे. या विभागातूनदेखील भोसरी ते राजगुरुनगर, भोसरी ते पुणे स्टेशन, पुणे मनपा या मार्गांवर सवलत पास योजनेचा प्रवाशांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घेतल्याची माहिती भोसरीचे पीएमपील डेपोचे व्यवस्थापक सतीश गव्हाणे यांनी दिली.