शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
4
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
5
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
6
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
7
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
8
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
9
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
10
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
11
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
12
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
13
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
14
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
15
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
16
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
17
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
18
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
19
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
20
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
Daily Top 2Weekly Top 5

स्वस्त पासमुळे पीएमपी सुसाट

By admin | Updated: August 17, 2016 01:30 IST

महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) सुरू केलेल्या ५० रुपयांत दैनंदिन पासच्या योजनेला तुफान प्रतिसाद मिळत आहे.

पुणे : महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) सुरू केलेल्या ५० रुपयांत दैनंदिन पासच्या योजनेला तुफान प्रतिसाद मिळत आहे. केवळ दोनच दिवसांत बसच्या पासधारकांची संख्या दुपटीपेक्षा अधिक झाली आहे. ओळखपत्राची सक्ती नाही, सुट्या पैशांची झंझट नाही, तिकीट खरेदी केल्यासारखे पास खरेदी करा आणि हव्या त्या ठिकाणी प्रवास करा असे योजनेचे स्वरूप असल्याने त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.महापालिकेने १४ आॅगस्टपासून ५० रुपयात दैनंदिन पास ही योजना सुरू केली आहे. हा पास पहाटे ५ पासून मध्यरात्री शेवट बस वेळेपर्यंत वैध आहे . ५० रुपयात दैनंदिन पास ही योजना सुरू होण्यापूर्वी पासधारकांची संख्या ३५०० इतकी होती सवलतीनंतर पासधारकांच्या संख्या ४ हजार ७०० इतकी वाढ झाली आहे. पासची योजना लागू करण्यापूर्वी पालिकेला पासमधून २ लाख ४५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले होते, सवलतीनंतर हे उत्पन्न ३ लाख ७५ हजार इतके झाले आहे. पासधारकांच्या संख्येत ५०० टक्के इतकी वाढ व्हावी असे उद्दिष्ट पीएमपी प्रवासी मंचच्या वतीने ठेवण्यात आले असून त्याकरिता नागरिकांचे प्रबोधन करण्यात येणार असल्याची माहिती पीएमपी प्रवासी मंचचे जुगल राठी, विवेक वेलणकर, सतीश शितोळे, संजय शितोळे, यतीश देवाडिगा यांनी दिली.बसचा प्रवास हा रिक्षापेक्षा महाग पडत होता, त्यामुळे नागरिकांकडून बसऐवजी रिक्षाला प्राधान्य दिले होते. ५० रुपयात पास उपलब्ध होत असल्याने नागरिक पुन्हा बसकडे वळू लागले आहेत. सध्याचे कमी अंतराचे ५० मार्ग वगळता उर्वरित ३००पेक्षा अधिक बस मार्गाचे एकेरी भाडे २५ रुपयांपेक्षा जास्त आहे. तसेच अनेक प्रवासी दिवसभरात त्याच किंवा इतर मार्गावर दोन किंवा अधिक वेळाही प्रवास करतात. ओळखपत्राची सक्ती नसल्याने एका प्रवाशाने पास खरेदी केल्यानंतर तो दुसऱ्याला हस्तांतरित करण्याचीही शक्यता आहे. मात्र पीएमपीकडून हस्तांतरित पासबाबत सूट ठेवण्यात आल्याचे दिसून येत आहे.आयुक्तांनी केला प्रवासपुणे : महापालिकेचे आयुक्त व पुणे महानगर परिवहन मंडळाचे (पीएमपी) अध्यक्ष कुणाल कुमार यांनी मंगळवारी बसचा ५० रुपयांचा दैनंदिन पास खरेदी करून बसमधून प्रवास केला. साधू वासवानी चौक ते सिमला आॅफिसपर्यंत बसमधून जाऊन त्यांनी प्रवाशांच्या समस्या जाणून घेतल्या. खुद्द आयुक्त आपल्यासोबत बसमधून प्रवास करीत असल्याचे पाहून प्रवाशांना या वेळी सुखद धक्का बसला. पीएमपीच्या वतीने १४ आॅगस्टपासून ५० रुपयांत बसचा पास ही योजना सुरू केली आहे. या योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याच्या पार्श्वभूमीवर कुणाल कुमार यांनी स्वत: बसचा दैनंदिन पास खरेदी करून बसमधून प्रवास केला. साधू वासवानी चौकातील बसस्टॉपवरून ते बसमध्ये चढले. या वेळी त्यांनी बसमधील प्रवाशांच्या अडचणी जाणून घेतल्या. दररोज बस वेळेवर येते का, बसचा प्रवास कसा वाटतो याची विचारणा त्यांनी प्रवाशांकडे केली. बसच्या कंडक्टर यांच्याशीही त्यांनी संवाद साधला. या वेळी पीएमपीचे सहव्यवस्थापकीय संचालक डी. पी. मोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुषमा कोल्हे, जनरल मॅनेजर अनंत वाघमारे उपस्थित होते. नागरिकांनी दुचाकीचा वापर कमी करून पीएमपीकडे जास्त संख्येने वळावे यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. लवकरच पीएमपीच्या ताफ्यात १५०० बस दाखल होणार आहेत. सर्व बसना जीपीएस सिस्टिम बसविण्यात आली आहे. पीएमपीचे अ‍ॅप सुरू करण्यात आले आहे, त्यामध्ये बस कधी येणार, ती सध्या कुठे आहे याची सविस्तर माहिती मिळणार आहे.