शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

पुणे, पिंपरीत पीएमपीचे थांबे ४ हजार अन् शेड केवळ १,४००

By admin | Updated: July 19, 2015 03:56 IST

पुणे, पिंपरी-चिंचवडसह इतर भागांत पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) सुमारे ४ हजार बसथांबे केले असले, तरी केवळ १,४०० बसथांब्यांवर शेड उभारण्यात आले आहेत.

पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवडसह इतर भागांत पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) सुमारे ४ हजार बसथांबे केले असले, तरी केवळ १,४०० बसथांब्यांवर शेड उभारण्यात आले आहेत. त्यामुळे लाखो प्रवाशांना ऊन-पाऊस झेलतच प्रतीक्षा करावी लागत आहे. तर, उभारण्यात आलेल्या शेडपैकी अनेक प्रवाशांसाठी गैरसोयीचेच ठरत आहेत. एका बाजूला बसस्टॉप नसताना दुसरीकडे खासदार आणि आमदार निधीतून गरज नसलेल्या ठिकाणीही उभारले गेल्याचेही ‘लोकमत’च्या पाहणीमध्ये आढळून आले आहे. दररोज सुमारे दीड कोटी रुपयांचे उत्पन्न देणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेकडे पीएमपी प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. पीएमपी बसने दररोज सुमारे १० लाख प्रवासी ये-जा करतात. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागातही लांबपर्यंत प्रवाशांसाठी बससेवा पुरविली जाते. बस धावणाऱ्या मार्गांवर पीएमपीने सुमारे ४ हजार अधिकृत बसथांबे दिले आहेत. या थांब्यांवर बसना थांबण्याची परवानगी असते. यामध्ये काही विनंती थांबेही आहेत. या थांब्यांपैकी सुमारे १,४०० थांब्यांवरच प्रवाशांसाठी शेड उभारण्यात आले आहेत. ऊन-पावसापासून प्रवाशांचा बचाव व्हावा, हा त्यामागचा उद्देश आहे. तसेच, या शेडमध्ये प्रवाशांच्या बसण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. यांतील सुमारे ५०० बसथांबे बीओटी तत्त्वावर जाहिरातदारांना देण्यात आले आहेत. त्यांनीच या थांब्यांची देखभाल करणे अपेक्षित आहे. तर, हे थांबे पीएमपीच्या मालकीचे आहेत. पीएमपीने प्रवाशांसाठी उभारलेल्या अनेक शेड गैरसोयीच्याच ठरत आहेत. ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत बऱ्याचशा शेडची दुरवस्था झाल्याचे आढळून आले आहे. गळके छत, कचऱ्याचा ढिगारा, श्वानांचा वावर, खासगी वाहनांचा विळखा, आसनव्यवस्था गायब अशा समस्यांना प्रवाशांना दररोज तोंड द्यावे लागते. सुमारे ४ हजार बसथांब्यांसाठी तेवढेच शेड असणे आवश्यक असताना उपलब्ध शेडचीही दुरवस्था झाली आहे. तसेच, खासदार व आमदारांच्या निधीतून ठिकठिकाणी बसविण्यात आलेल्या स्टीलच्या शेडही कुचकामी असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी आहेत. त्यांच्या आकाराबाबत वादही झाले आहेत.